---Advertisement---

शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाचे वर्चस्व

On: बुधवार, सप्टेंबर 18, 2019 2:37 PM
---Advertisement---

मुंबई। शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील सर्व गटाच्या स्पर्धा डीएसओ धारावी येथे पार पडल्या. ९ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान डीएसओ कॉम्प्लेक्समधील हॉलमध्ये ही स्पर्धा रंगली. पावसाच्या व्यतयामुळे मातीवर खेळवण्यात येणारी ही स्पर्धा ऐनवेळी मॅटवर घेण्यात आली. यास्पर्धेत १७ व १९ वर्षाखालील दोन्ही विभागात महर्षी दयानंद महाविद्यालयाने अंतिम विजेतेपद पटकावले.

या कबड्डी स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात ७३ मुलाचे तर ३९ मुलींचे संघ, १७ वर्षाखालील गटात ८५ मुलांचे आणि ४१ मुलींचे संघ तसेच १९ वर्षाखालील गटात ३४ मुलांचे आणि २० मुलींचे संघानी सहभाग घेतला होता. एकूण २९२ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.

काल (१७ सप्टेंबर) स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी १९ वर्षांखालील मुलीच्या अंतिम सामन्यात महर्षी दयानंद महाविद्यालयाने खालसा कॉलेजचा ४१-३७ असा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले. महर्षी दयानंद महाविद्यालयाकडून आरती मातकंटे, रुनाली भुवड, राणी गुप्ता व साक्षी पाटील याचा मोलाचा वाटा होता. मध्यंतरापर्यत २९-११ असा पिछाडीवर असताना देखील खालसा कॉलेजकडून मानसी पाटील व साक्षी सावंत यांनी उत्कृष्ट खेळ करत सामन्यांत चुरस वाढवली होती. परंतु शेवटच्या मिनिटाला २ सुपर टॅकल झाल्यानें अटीतटीच्या सामन्यांत महर्षी दयानंद संघाने बाजी मारली.

तर १९ वर्षाखालील मुलाच्या अंतिम सामन्यात महर्षी दयानंद महाविद्यालयाने डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा ३९-३७ असा पराभव केला. महर्षी दयानंदकडून आकाश चव्हाण, राज आचार्य, साहिल पाटील व अनिकेत रहाटे यांनी चांगला खेळ दाखवला. तर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाकडून अभिषेक जाधव व संतोष ठाकूर यांनी चांगली लढत दिली.

१४ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात मारवाडी विद्यालयाने शारदाश्रम विद्यामंदिर (मराठी) या संघावर ८७-६८ असा विजय मिळवला. मध्यंतरा पर्यत ३९-३८ अशी शारदाश्रम संघाकडे अवघ्या १ गुणांची आघाडी होती. तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत गौरीदत्त मित्तल संघाने डी. एस. हायस्कुल संघाचा ४६-२० असा पराभव केला.

Photo Courtesy: Viraj Jambhale

मुलींच्या १४ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यांत एस. आय. इ. एस. संघाने ना.म. जोशी संघावर ५३-४५ असा विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत चुनीलाल मेहताने गौरीदत्त मित्तलवर ३१-३० असा विजय मिळवला.

१७ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यांत महर्षी दयानंद महाविद्यालयाने ४०-०७ असा लिटिल स्टार संघाचा एकतर्फी पराभव केला. महर्षी दयानंद महाविद्यालयाकडून आझाद केवट, सूरज खोत, रजत सिंग, शार्दूल पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर मुलींच्या गटात ही महर्षी दयानंद महाविद्यालयाने बाजी मारली. महर्षी दयानंद संघाने शारदाश्रम विद्यामंदिर संघाचा ४४-२९ असा पराभव केला. या विजयात आकांक्षा बने, प्राची भाडवांकर, मानसी पाटील, श्रुती मडगूल यांनी चमकदार कामगिरी केली.

Photo Courtesy: Viraj Jambhale

संक्षिप्त निकाल:

१४ वर्षाखालील मुले
विजेते- मारवाडी विद्यालय
उपविजेते- शारदाश्रम विद्यामंदिर (मराठी)
तिसरा क्र.- गौरीदत्त मित्तल

१४ वर्षाखालील मुली
विजेते- एस. आय. इ. एस.
उपविजेते- ना. म. जोशी
तिसरा क्र.- चुनीलाल मेहता

१७ वर्षाखालील मुले
विजेते- महर्षी दयानंद महाविद्यालय
उपविजेते- लिटिल स्टार
तिसरा क्र.- एम. के. इ. एस.

१७ वर्षाखालील मुली
विजेते- महर्षी दयानंद महाविद्यालय
उपविजेते- शारदाश्रम विद्यामंदिर
तिसरा क्र.- ऑवर लेडी

१९ वर्षाखालील मुले
विजेते- महर्षी दयानंद महाविद्यालय
उपविजेते- डॉ. आंबेडकर महाविद्यालय
तिसरा क्र.- एस. आय. डब्ल्यू. एस.

१९ वर्षाखालील मुली
विजेते- महर्षी दयानंद महाविद्यालय
उपविजेते- खालसा कॉलेज
तिसरा क्र.- रामनिवास रुईया कॉलेज

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

प्रो कबड्डीत नीरज कुमारने केली ‘या’ मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी

पुणेरी पलटनच्‍या खेळाडूंनी चाहत्‍यांच्‍या घरी भेट देत त्यांना केले अचंबित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment