आयपीएल इतिहासामध्ये आतापर्यंत 16 खेळाडूंनी सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. 16 पैकी 10 सामन्यांत भारतीय खेळाडूंनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.
आयपीएल 2024 चा अंतिम सामना आज (26 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. चेन्नई येथील चेपाॅक स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. चेन्नईच्या या मैदानावर कोणता खेळाडू आपल्या संघाच्या विजयाचा शिलेदार ठरणार? याचं उत्तर आपल्याला आज रात्री मिळेल. पण त्याआधी जाणून घेऊया, आयपीएलच्या इतिहासात फायनल सामन्यांमध्ये कोण-कोणते खेळाडू ठरले आहेत विजयाचे हिरो.
तुम्हाला जाणून कदाचित आश्चर्य वाटेल की, आयपीएल इतिहासात फक्त 6 वेळा असं झालं आहे की, अंतिम सामन्यामध्ये विदेशी खेळाडूनं सामनावीराचा पुरस्कार जिंकला. 2013 मध्ये पहिल्यांदा कायरन पोलार्डनं सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. 2008 पासून 2023 पर्यंत 10 भारतीय खेळाडू सामनावीराचा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत.
आयपीएल फायनलमध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकणारे खेळाडू –
2008- युसूफ पठाण (राजस्थान राॅयल्स)
2009- अनिल कुंबळे (डेक्कन चार्जस हैदराबाद)
2010- सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्ज)
2011- मुरली विजय (चेन्नई सुपर किंग्ज)
2012- मनविंदर बिसला (कोलकाता नाईट रायडर्स)
2013- कायरन पोलार्ड (मुंबई इंडियन्स)
2014- मनिष पांडे (कोलकाता नाईट रायडर्स)
2015- रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
2016- बेन कटिंग (सनरायजर्स हैदराबाद)
2017- क्रुणाल पांड्या (मुंबई इंडियन्स)
2018- शेन वाॅटसन (चेन्नई सुपर किंग्ज)
2019- जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
2020- ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स)
2021- फाफ डू प्लेसिस (चेन्नई सुपर किंग्ज)
2022- हार्दिक पांड्या (गुजरात टायटन्स)
2023- डेवाॅन काॅनवे (चेन्नई सुपर किंग्ज)
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याचा मास्टरस्ट्रोक! जर असं झालं तर नताशाला संपत्तीचा वाटा मिळणार नाही
कोलकाता नाईट रायडर्सला पुन्हा एकदा ट्रॉफी मिळवून देणार का गाैतम गंभीरचा ‘हा’ गेम प्लॅन?
फायनलपूर्वी भुवनेश्वर कुमारनं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “आता आम्ही फायनलमध्ये…”