आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) कडून पराभव झाला होता. मुंबईचा यूएई मधील हा सलग पाचवा पराभव होता. मात्र काल 23 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी पराभूत केले. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यामुळे त्याची सामनावीर म्हणून निवड झाली.
मुंबईने योजना व्यवस्थितपणे राबविल्या
रोहितने केवळ 39 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात 54 चेंडूत 80 धावा केल्या. या डावात त्याने 6 षटकार आणि 4 चौकार ठोकले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “आज आम्ही आमच्या योजना व्यवस्थितपणे राबविल्या, आम्ही या सामन्यात नेहमीच चांगल्या स्थितीत होतो. खेळपट्टी चांगली होती आणि दव कमी होते. पुल फटके खेळायला मला आवडते. मी या फटक्यांचा बराच सराव केला आहे. संघाच्या कामगिरीमुळे खूप आनंद झाला आहे. माझे सर्व फटके चांगले होते. मी गेल्या सहा महिन्यांत क्रिकेट खेळलो नाही आणि त्या कारणास्तव मला खेळपट्टीवर थोडा वेळ घालवायचा होता.”
युएईमध्ये आयपीएल होईल याची नव्हती कल्पना
पुढे बोलतांना तो म्हणाला, “आयपीएल युएईमध्ये होईल हे आम्हाला माहीत नव्हते, त्यामुळे वानखेडे स्टेडियम मधील खेळपट्टीला अनुकूल असे वेगवान गोलंदाज आम्हाला हवे होते. कदाचित मी शेवटच्या क्षणी थोडा थकलो होतो आणि आम्हाला शेवटपर्यंत फलंदाजी करणार्या एका फलंदाजाची गरज होती. आम्हाला यापूर्वीच हे समजले आणि आज मी शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न केला.”
रोहितने आयपीएलमध्ये ठोकले 200 षटकार
असे फक्त 4 फलंदाज आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये 200 किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. आता रोहितही त्या 4 फलंदाजांपैकी एक बनला आहे. रोहितशिवाय आतापर्यंत फक्त एमएस धोनी, एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेल ही कामगिरी करु शकले आहेत.
आयपीएलमध्ये रोहितचे 200 षटकार आहेत, तर धोनीने आतापर्यंत 212 षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत 214 षटकार ठोकणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्स धोनीनंतर दुसर्या क्रमांकावर आहे.
त्याचबरोबर, षटकार ठोकण्याच्या बाबतीत पहिले नाव किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज ख्रिस गेल याचे आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 326 षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-२ मोठे विक्रम केले पण ‘या’ गोष्टीमुळे मोठ्या विक्रमापासून रोहित शर्मा राहिला दूर
-एका मराठी चाहत्याला आपलं शेवटचं ट्विट करत या महान क्रिकेटपटूने जगातून घेतली एक्झिट
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज
-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज
-श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….