कर्नाटकमधील व्यावसायिक टी20 लीग असलेल्या महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवारी (29 ऑगस्ट) खेळला गेला. हुबळी टायगर्स व मैसूर वॉरियर्स यांच्यातील या अंतिम सामन्यात सामन्याचा निकाल अखेरच्या चेंडूवर लागला. हुबळी संघाने 8 धावांनी विजय मिळवत ट्रॉफी आपल्या नावावर केली. मात्र, त्याचवेळी हुबळी संघाचा कर्णधार मनीष पांडे याने अखेरच्या षटकात केलेल्या कमालीच्या क्षेत्ररक्षणामुळे हा विजय साध्य होऊ शकला.
Saved on the boundary: Turning tweets into memories, ft. Manish Pandey! 🏏✨
.
.#CricketTwitter #KSCA @im_manishpandey pic.twitter.com/I8Ks6C6kyR— FanCode (@FanCode) August 29, 2023
अंतिम सामन्यात हुबळी संघाने मोहम्मद पहा व मनीष पांडे यांच्या अर्धशतकाच्या जोरावर मैसूर संघासमोर विजयासाठी 204 धावांचे मोठे आव्हान ठेवलेले. त्याचा पाठलाग करताना समर्थ व कर्णधार करूण नायर यांनी शानदार फलंदाजी केली. अखेरच्या षटकात विजयासाठी त्यांना 12 धावा हव्या होत्या.
अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी पांडे याने वीस वर्षाच्या मानवत याच्याकडे दिली. त्याने पहिल्याच चेंडूवर बळी मिळवत चांगली सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवर एक धाव निघाल्यामुळे चार चेंडूंमध्ये 11 धावा असे समीकरण आले होते. अनुभवी जगदीशा सुचित या चेंडूचा सामना करत होता. त्याने शानदार संपर्क साधत चेंडू हवेत उडवला. लॉंग ऑफच्या दिशेने हा षटकार जाणार असे वाटत असताना, त्या ठिकाणी तैनात असलेल्या मनीष पांडे याने हवेत झेपावत सुरेख पद्धतीने चेंडू अडवत षटकार जाऊ दिला नाही.
त्यामुळे या चेंडूवर एकच धाव निघाली. त्यानंतर पुढील तीन चेंडूंवर मानवत याने केवळ दोन धावा देत सूचित याला बाद करण्यात देखील यश मिळवले. यासोबतच हुबळी संघाने विजेतेपद आपल्या नावे केले. मात्र, मनीष पांडे याच्या या क्षेत्ररक्षणाचे कौतुक अनेक जण करत आहेत.
(Manish Pandey Superb Fielding Heroics Helps Hubli Tigers To Win Maharaja T20)
महत्वाच्या बातम्या-
हुबळी टायगर्स महाराजा टी20 चॅम्पियन! कॅप्टन मनीष पांडेच्या क्षेत्ररक्षणाने पलटली बाजी
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किड्स गटात फिंच संघाला विजेतेपद