कॅनडाची प्रसिद्ध टेनिसपटू युजेनी बोशार्डने मारिया शारापोवावर घणघणती आरोप करताना तिला चीटर असे संबोधले. तसेच तिला आयुष्यभर बंदी घालावी असेही म्हटले आहे.
रशियाची खेळाडू असलेली, जगातील सर्वात महागडी महिला टेनिसपटू मारिया शारापोवाने तब्बल १५ महिन्यांच्या बंदीनंतर स्टुटगार्ड ओपनमध्ये जोरदार पुनरागम केले. मेल्डोनियम या उत्तेजक द्रव्य चाचणीत ती दोषी आढळली होती.
“शारापोवाला संधी देणं हे नक्कीच बरोबर नाही. ती एक चीटर आहे. आणि अशा खेळाडूंना कोणत्याही खेळात पुन्हा संधी दिलीच नाही पाहिजे,” जागतिक क्रमवारीत ५७ व्या स्थानावर असलेल्या युजेनी बोशार्डने नमूद केले.
याबद्दल पुढे विश्लेषण करताना बोशार्ड म्हणते, ” जे खेळाडू खरे आहेत, त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. मला वाटते की डब्लूटीए टेनिस मध्ये नव्याने येणाऱ्या खेळाडूंना एक चुकीचा संदेश देतय. तुम्ही काहीही करा आम्ही तुम्हाला पुन्हा सन्मानाने खेळवू.”
https://twitter.com/ESPNTennis/status/857542943002968064