अनेक कठीण सामन्यांमध्ये वादळी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंमध्ये वीरेंद्र सेहवाग याचाही समावेश होतो. सेहवागला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. सेहवागने अनेक मोठमोठे विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. हाच सेहवाग गुरुवारी (दि. 20 ऑक्टोबर) त्याचा 44वा वाढदिवस साजरा करत आहे. हा दिवस जसा उजाडला, तसा सेहवागवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचाही समावेश आहे. त्याने अनोख्या अंदाजात सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हे दोघेही त्यांच्या सोशल मीडियावरील अनोख्या अंदाजासाठी ओळखले जातात. सेहवागच्या वाढदिवशी आपला हाच अनोखा अंदाज सचिनने पुन्हा दाखवला. सचिनचे शुभेच्छा देणारे ट्वीट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
सचिन तेंडुलकरचे ट्वीट
सचिन तेंडुलकरने ट्वीट (Sachin Tendulkar Tweet) कर लिहिले की, “चौकारावर चौकार मारत 44वर पोहोचला, आता 44 वरून 50वर जाण्यासाठी 6 बनतोच. वाढदिवसाच्या शुभेच्छा वीरू.” सचिनचे हे ट्वीट सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे.
Chauke pe chauka maarte huye 44 par pahunch gaye. Ab 44 se 50 ke liye 6 banta hai!😜
Happy birthday Viru! pic.twitter.com/4Kh8QksvRi
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 20, 2022
विशेष म्हणजे, सेहवागनेही सचिनच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देत लिहिले की, “तुमच्यासोबत असताना अशी जोखीम कुठे घेऊ शकतो पाजी. जेव्हा 295चा होईल, तेव्हाच तुम्ही मला परवानगी द्याल. तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्यासोबत असताना हा प्रवास खूपच सोपा राहिला पाजी.”
Aapke saath hote huye kahan aisa risk le sakte hain, Paaji .
Jab 295 ka ho jaaonga , aap izaazat toh tab hi denge ..Thank you very much for your wishes, the journey became much easier with you around, Paaji. https://t.co/7JVOujn7B0
— Virender Sehwag (@virendersehwag) October 20, 2022
खरं तर, सेहवागचा हा अनोखा अंदाज फक्त सोशल मीडियावरच नाही, तर त्याने त्याच्या कारकीर्दीतही अनेक तुफान डाव खेळले आहेत. त्यामध्ये त्याने बेधडकपणे केलेली फलंदाजी सर्वांच्या स्मरणात आहे. ‘6 तर बनतोच’, असे सचिनने म्हणण्यामागील कारण म्हणजे, सेहवाग शतक, द्विशतक आणि त्रिशतकाच्या जवळ पोहोचूनही नेहमी षटकार मारण्याचा प्रयत्न करायचा. यामध्ये तो अनेकदा यशस्वी राहिला, तर अनेकदा अयशस्वीही राहिला.
सेहवागची कारकीर्द
वीरेंद्र सेहवाग याने भारतीय संघाकडून 104 कसोटी सामने, 251 वनडे सामने आणि 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 49.34च्या सरासरीने 8586 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 23 शतके आणि 32 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याची 319 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. याव्यतिरिक्त वनडेत त्याने 35.05च्या सरासरीने 8273 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने 15 शतके आणि 38 अर्धशतक केली आहेत. याव्यतिरिक्त त्याने आंतरराष्ट्रीय टी20त 21.88च्या सरासरीने 394 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याला फक्त 2 अर्धशतके करता आली. त्याने शेवटचा आंतराष्ट्रीय कसोटी सामना 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याने 2015मध्ये निवृत्ती घेतली होती. सध्या तो समालोचक आणि क्रिकेट विश्लेषकाची भूमिका पार पाडतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडे अन् सूनबाईंच्या शुभेच्छा एकीकडे, मयंतीची अध्यक्ष बिन्नींंसाठी खास पोस्ट
विराटने ‘या’ पोरीला बनवले सोशल मीडिया स्टार, एकाच फोटोमुळे झाली सगळीकडे व्हायरल