इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी बेन स्टोक्स याच्याविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. बेन स्टोक्स 2022 च्या सुरुवातीला व्यस्त वेळापत्रकामुळे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. पण प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतलेली निवृत्ती स्टोक्स माघारी घेऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत. पुढच्या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्टोक्सने इंग्लंडसाठी महत्वाची भूमिका पार पाडावी असे त्यांना वाटते.
इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट (Matthew Mott) यांच्या मते बेन स्टोक्स (Ben Stokes) याने एकदिवसीय क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती मघारी घ्यावी. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) च्या अंतिम सामन्यात तो मॅच विनर ठरला. त्याने शेवटच्या षटकांमध्ये संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलली आणि विजेतेपद मिळवले देखील. पुढच्या वर्षी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (ICC ODI World Cup 2023) भारतात आयोजित केला गेला आहे. या महत्वाच्या स्पर्धेत देखील स्टोक्स इंग्लंडसाठी मॅच विनरची भूमिका पार पाडू शकतो, पण त्याने निवृत्ती माघारी घेतली, तरच हे शक्य होईल.
मॅथ्यू मॉट माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “तो तीन आयामी (थ्री डायमेंशनल) खेळाडू आहे. संघाला देण्यासाठी त्याच्याकडे खूपकाही आहे. आमच्याकडे असाधारान गोष्टी करू शकणारे खूपजण आहेत. मात्र, स्टोक्स असा खेळाडू आहे, जो खेळपट्टीवर असला म्हणजे आपण सामना जिंकत आहोत, असेच वाटते.”
“जेव्हा त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया अशीच होती की, त्याच्या प्रत्येक निर्णयाला माझे समर्थन असेल. परंतु मी त्याला असेही म्हटलो की, निवृत्त होण्याची गरज नाहीये. तू अजून पुढचा काही काळ खेळू शकतो आणि निवृत्ती घेतली नाही, तरीही चालेल,” असे मॉट पुढे म्हणाले.
स्टोक्सच्या पुनरागमनाविषयी बोलताना मॉट म्हणाले, “मी आज त्याला पुनरागमन करण्यासाठी सांगेल. पण तो त्याच्या मनाला वाटते तेच करेल. तो स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो. इंग्लिश क्रिकेटसाठी जे योग्य असेल तेच तो करेल आणि आधीपासून असेच करत आला आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय देखील त्याचा स्वतःचा होता.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने सानिया मिर्झाला दिल्या वाढदिवसाच्या ‘हटके’ शुभेच्छा, पाहाच एकदा
भारताविरुद्धच्या टी20-वनडे मालिकांसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; दोन दिग्गजांना वगळले, तर नेतृत्वाची कमान…