---Advertisement---

बोल्ड होऊनही मयंकचा बसेना विश्वास, काही सेकंद एकाच स्थितीत राहिला उभा, व्हिडिओ होतोय व्हायरल 

On: मंगळवार, जुलै 20, 2021 9:00 PM
---Advertisement---

डरहॅम। इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारताय कसोटी संघाचा मंगळवारपासून (२० जुलै) काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताने पहिल्या चार विकेट लवकर गमावल्या. तसेच या सामन्यादरम्यान, सर्वांचे लक्ष असलेला मयंक अगरवालही फार काही करु शकला नाही. तो लॉलीपॉप चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याच्या विकेटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल यांची जोडी सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरली होती. पण रोहित केवळ ९ धावा करुन लिंडन जेम्सने टाकलेल्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याच्यानंरत काही वेळातच मयंकही पॅव्हेलियनमध्ये परतला.

मयंकला डावाच्या १४ व्या षटकात लिंडन जेम्सनेच त्रिफळाचीत केले. जेम्सने या षटकातील टाकलेल्या चौथ्या चेंडूवर मयंक बचावात्मक फटका खेळण्याचा विचार करत होता. पण त्याने फटका मारण्यासाठी बॅट पुढे करण्यापूर्वीच चेंडू खेळपट्टीवर टप्पा पडून आतल्या बाजूने गेला आणि थेट स्टंपवर जाऊन आदळला. तो चेंडू पाहून मयंक देखील आश्चर्यचकीत झाला. त्यामुळे तो काही क्षण फटका मारण्यासाठी घेतलेल्या पवित्र्यातच स्तब्ध थांबला. मंयकने ३५ चेंडूत २८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार मारले.

मयंक बाद झाल्यानंतरही चेतेश्वर पुजारा २१ आणि हनुमा विहारी २४ धावांवर बाद झाले. मात्र, त्यानंतर केएल राहुलने अर्धशतकी खेळी करत डाव सांभाळला. त्याला रविंद्र जडेजाने चांगली साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत ६० षटकांच्या आत भारताला १८० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

रोहित आहे कर्णधार
या सराव सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिरकीपटू आर अश्विन यांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.

भारताला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नो बॉल टाकूनही होतेय भुवीचे कौतुक, कारनामा देखील केलाय तसाच

Video: चहलने विणले फिरकीचे जाळे; २ चेंडूत २ विकेट घेत टीम इंडियाला करून दिले सामन्यात पुनरागमन

इंग्लंड दौऱ्यावर गेलेले ‘हे’ दोन भारतीय खेळाडू करतायेत आपल्याच संघाविरुद्ध दोन हात, पाहा तो अनोखा नजारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---