मुंबई क्रिकेट असोसिएशनने भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचे नाव वानखेडे स्टेडियमवरील नॉर्थ स्टँडच्या ३ ब्लॉकला देण्याचा निर्णय घेतला आहे.
वेंगसरकर यांचे नाव ३ ब्लॉकला देण्याचा प्रस्ताव या महिन्याच्या सुरूवातीला अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य नदीम मेमन यांनी दिला होता. मंगळवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलीप वेंगसरकर यांना त्यांच्या संग्रहालय समितीचा एक भागही बनवले आहे. यामध्ये एमसीएचे माजी अध्यक्ष रवी सावंत, बीसीसीआयचे माजी अधिकारी रत्नाकर शेट्टी, एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीएस नाईक, बीसीसीआयचे माजी मीडिया मॅनेजर देवेंद्र प्रभुदेसाई, एक्स कमिटीचे सदस्य नवीन शेट्टी आणि ज्येष्ठ पत्रकार क्लेटन मुरजेलो यांचा समावेश आहे.
वेंगसरकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत ११६ कसोटी सामने खेळले असून १२९ वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत ६८६८ धावा आणि वनडेत त्यांनी ३५०८ धावा केल्या आहेत. त्यांच्यानावावर लॉर्ड्सवर सलग तीन शतके करण्याचाही विक्रम आहे. तसेच त्यांनी २००६ ते २००८ दरम्यान भारतीय संघाच्या निवड समीतीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्याचबरोबर ते एसीएचे २००१ ते २००७ दरम्यान उप-अध्यक्षही राहिले आहेत.
याआधी वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला सचिन तेंडुलकरचे तर एका स्टँडला सुनील गावसकरांचे नाव देण्यात आले आहे.
वानखेडे स्टेडिअममधील एक सीट होणार धोनीच्या नावावर?
मुंबई क्रिकेट असोसिएशन अॅपेक्स कौन्सिल सदस्य अजिंक्य नाईक यांनी सोमवारी एमसीएला एक पत्र लिहून जिथे २०११ विश्वचषकाचा विजयी षटकार पडला होता, ती सीट धोनीच्या नावावर करण्यात यावी, याबाबत प्रस्ताव ठेवला होता. एमएस धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ड्रीम ११ला प्रायोजक करताना चीनविरुद्धच्या भारतीयांच्या भावनांकडे दुर्लक्ष्य, पहा कुणी केलाय हा आरोप
कष्टाचं चीज झालं! कबड्डीपटू दिपक हुडाला अर्जुन पुरस्कार जाहीर
इंडियन प्रीमियर लीग २०२०चा ड्रीम लोगो तुम्ही पाहिलाय? पहा कसा दिसतोय हा नवाकोरा लोगो
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल२०२० : आरसीबीच्या या ३ खेळाडूंना कदाचित मिळणार नाही एकाही सामन्यात खेळण्याची संधी
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना फ्लॉप ठरलेले ३ टी२० क्रिकेटमधील दिग्गज
५ वेळा क्रिकेट इतिहासात गोलंदाज झाले ओपनर, केल्या धमाकेदार खेळी