---Advertisement---

मॅक्युलमवर आली 12 फुट उंच जाळी सर करण्याची वेळ, जाणून घ्या कराची कसोटीत असं काय घडलं?

Brendon McCullum
---Advertisement---

ब्रँडन मॅक्युलम इंग्लंड संघाच्या मुख्य प्रशिक्षकदी नियुक्त झाल्यापासून संघाच्या प्रदर्शनात लक्षणीय सुधारणा पाहायला मिळाली आहे. इंग्लंड संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून तिसरा कसोटी सामना कराचीमध्ये खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानात उपस्थित मॅक्युलमने असे काही केले, जे पाहून प्रेक्षाकांना आश्चर्य वाटले.  

कराचीमध्ये इंग्लंड संघाला मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित असलेला ब्रँडन मॅक्युलम (Brendan McCullum) सोमवारी (19 डिसेंबर) मात्र, काहीतरी वेगळेच करताना दिसला. त्याने स्टेडियमच्या सीमारेषेपार उभ्या असलेल्या 12 उफ उंच जाळीवर चढण्याचे धाडस केले. मॅक्युलमचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. आता प्रश्न हा राहतो की, अखेर मॅक्युलमने हे धाडस केलच कशासाठी? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मॅक्युलमने एका चाहत्याचा या जाळीत अडकलेला टी-शर्ट काढण्यासाठी हे पाऊल उचलले.

या चाहत्याचा टी-शर्ट या जाईलत 12 फुटांच्या इंचीवर अडकला होता. अशात काही चाहते आणि मैदानातील कर्मचारी हा टी-शर्ट काढण्यासाठी काही वेळापासून प्रयत्न करत होते. त्यांनी काढीच्या मदतीने टी-शर्ट काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांना यत यश येत नव्हते. हा सर्व प्रकार मॅक्युलम जवळ उभा राहून पाहत होता. त्याने पाहिले की, हे चाहते बऱ्याच वेळापासून टी-शर्ट काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांना यश येत नाहीये. असात मॅक्युलमने स्वतः पुढाकार घेत टी-शर्ट काढण्याचे ठरवले. चाहते त्याची चवळाई आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

मॅक्युलम सध्या 41 वर्षांचा आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती निवृत्ती जरी घेतली असली, तरी त्याची फिटनेस आजही तरून खेळाडूंना लाजवेल अशीच आहे. काही दिवासंपूर्वीच मॅक्युलम आणि इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स यांच्यात सर्वाधिक षटकार मारण्याची स्पर्धा झाली. या स्पर्धेत मॅक्युलमने स्टोक्सला मात दिली असून, हा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे. मॅक्युलम इंग्लंडचे प्रशिक्षक बनल्यापासून संघाने कसोटी क्रिकेटमध्ये देखील आक्रमक खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. त्याच्या मार्गदर्शनात इंग्लंडने ‘बझबॉल’ रणनीती वापरात आणल्याचेही आपण अनेकदा ऐकत असतो.

https://www.instagram.com/reel/CmPM-QAD4Tg/?utm_source=ig_web_copy_link

पाकिस्तानविरुद्धच्या या तिसऱ्या कसोटी सामन्याच विचार केला, इंग्लंड विजयापासून 55 धावा दूर आहे. इंग्लंडकडे अजून 8 विकेट्स शिल्लक असून त्यांचा संघ यजमान पाकिस्तानला पराभूत करेल यात सध्या तरी कुठेच शका दिसत नाही. इंग्लंनडे जर हा सामना जिंकला, तर पाकिस्तानला पाहुण्या संघाकडून क्लीन स्वीप (0-3) मिळेल.  (McCullum’s climb the 12-foot net, find out what happened in the Karachi Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे काय सुरू केलंय?’ टीम इंडियात सुरू झालेल्या नव्या परंपरेवर भडकला ईशांत 
फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफी नेण्याचा मान दीपिकालाच कसा मिळाला? काय होतं कारण? घ्या जाणून 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---