भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी शतक ठोकले. कर्णधार रोहित शर्मा सह भारतीय संघाला 200 धावांची सलामी देत त्याने भारताला या कसोटीत आघाडीवर नेले. त्याच्या या खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. भारतीय खेळाडूंविषयी नेहमीच काहीतरी वादग्रस्त बोलणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन हा देखील यशस्वीच्या शतकानंतर त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.
He is going to be a superstar .. @ybj_19 👍👍👍 1 Tests innings .. 1 Ton already ..
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 13, 2023
जयस्वाल याने देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळताच त्याने या संधीचे सोने करत, शतक झळकावले. सचिन तेंडुलकरपासून अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या या खेळीचे कौतुक केले. वॉन याने ट्विट करत लिहिले,
‘तो सुपरस्टार होणार आहे. एक कसोटी डाव आणि त्याच्या खात्यावर एक शतक जमा आहे’
He is going to be a superstar .. @ybj_19 👍👍👍 1 Tests innings .. 1 Ton already ..
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 13, 2023
वॉन हा भारतीय खेळाडूंवर सातत्याने टीका करत असतो. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर व वॉन यांच्या दरम्यान वारंवार ट्विटर वॉर पाहायला मिळते. यामध्ये ते क्रिकेटसंबंधी मजा-मस्ती करताना दिसून येतात.
भारतीय संघात निवड झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात यशस्वी याला पदार्पणाची संधी देण्यात आली. त्याने या संधीचे सोने करताना भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात दिली. यशस्वीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टिच्चून फलंदाजी केली. त्याने यादरम्यान 350 चेंडूंचा सामना करताना 143 धावा केल्या. या धावा करताना त्याने 14 चौकारांचा पाऊस पाडला. आता चाहते त्याच्याकडून तिसऱ्या दिवशी द्विशतकाची अपेक्षा करत आहेत.
(Michael Vaughan Praised Yashasvi Jaiswal For Debute Hundred)
महत्वाच्या बातम्या –
अमेरिकेत सुपर किंग्सला मिळालेला पाठिंबा पाहून भावूक झाला प्लेसिस; म्हणाला, “हे आमचे कुटुंब…”
पुन्हा उडणार ‘टी20 चॅम्पियन्स लीग’चा धुरळा! ‘या’ देशांतील संघ भरणार रंग