श्रीलंका दौरा आटोपून इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारताविरुद्ध कसोटी, टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात कसोटी मालिकेने होणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीचा संघ जाहीर केला आहे. या संघातून धाकड फलंदाज जॉनी बेयरस्टो याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी इंग्लंडच्या संघ निवडकर्त्यांवर निशाणा साधला आहे.
वॉन यांच्या मते बेयरस्टो फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगली फलंदाजी करू शकतो. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यातून त्याला संघाबाहेर ठेवण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे यासंदर्भात ट्विट केले आहे.
वॉन यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “नक्कीच बेयरस्टो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सुरुवातीच्या सामन्यात इंग्लंडचा भाग असायला पाहिजे. त्याने नुकतेच इंग्लंड कसोटी संघातील आपले स्थान परत मिळवले आहे. तो फिरकीपटूंविरुद्ध अतिशय उत्तम फलंदाजी करतो. तरीही त्याला पहिल्या दोन कसोटीतून आराम देण्यात आला आहे.”
Surely @jbairstow21 stays with the Test team for the start of the #India series … makes no sense that a player who has only just got his Test place back & plays spin is well is resting !!!! #SLvENG !! #OnOn
— Michael Vaughan (@MichaelVaughan) January 25, 2021
वॉन यांनी बेयरस्टोला पाठिंबा देण्याची ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपुर्वीच त्यांनी बेयरस्टोबद्दल वक्तव्य केले होते. “इंग्लंड क्रिकेट संघाच्या टॉप-३ फलंदाजांतील एकमात्र खेळाडू उपखंडातील परिस्थितींशी समतोल साधताना दिसत आहे. सोबतच तो संयमी खेळी करताना दिसत आहे. आणि अशा फलंदाजाला तुम्ही जगातील सर्वश्रेष्ट भारतीय संघाविरुद्ध पहिल्या दोन कसोटीतून विश्रांती देण्याच्या विचारात आहात. यामुळे पूर्ण जग वेडे होणे साहजिक आहे”, अशा शब्दात त्यांनी ट्विट केले होते.
The only player in England’s Top 3 that’s playing the sub continent conditions with any control or calmness is resting for the first 2 Tests against the best Team in world at home #India !!! The world is officially mad … #SLvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) January 23, 2021
भारताविरुद्ध कसोटीत केल्यात जवळपास ६०० धावा
इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेयरस्टो याने भारताविरुद्ध आजवर कसोटीत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. २०१२ ते २०१८ या कालावधीत भारतीय संघाविरुद्ध बेयरस्टोने ११ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान ९३ धावांच्या सर्वोच्च खेळीसह त्याने ५९१ धावा केल्या आहेत.
फेब्रुवारीत सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होईल. पहिले दोन सामने ५ आणि १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार असून उर्वरित सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीचा इंग्लंड संघ
जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॅक क्राउले, बेन स्टोक्स, टेन लॉरेंस, जॅक लीच, डॉम सिब्ले, बेन फोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसके ग्लेन मॅक्सवेलला खरेदी करणार आणि सलामीलाही पाठवणार? भारतीय दिग्गजाचे भाकीत
ब्रिस्बेन कसोटीवेळी ‘या’ व्यक्तीने भारतातून केली होती मदत; शार्दुलने केला उलगडा
एकेकाळी ड्रेसिंग रूममध्ये बसून ढसाढसा रडणारा इंग्लंडचा खेळाडू करू शकतो टीम इंडियाला चितपट!