पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाच्या चाहत्यांची जगभरात कमी नाही. केवळ सामान्य चाहतेच नाही तर, संघासाठी खेळलेले खेळाडूही संघावर अजूनही प्रेम करतात. मुंबई इंडियन्स चा माजी खेळाडू राहिलेला न्यूझीलंडचा वेगवान मिचेल मॅक्लेनघनने ट्विटरवर मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लावू पाहणाऱ्या चाहत्याला चोख प्रत्युत्तर दिले. मॅक्लेनघनने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सबरोबर आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती.
मिशेल मॅक्लेनघन यंदा आयपीएलमध्ये खेळत नाही. त्याला मुंबई इंडियन्सने करारमुक्त केले होते. त्याने आयपीएलमध्ये मुंबईसाठी ५६ सामने खेळले असून त्यात ८.४९ च्या इकोनॉमी रेटने ७१ बळी घेतले आहेत. संघाचा भाग नसला तरी तो अजूनही संघाला पाठिंबा देत आहे. जेव्हा ट्विटरवर काही चाहत्यांनी मुंबई इंडियन्सवर प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याने त्या चाहत्याला चांगलेच फटकारले. मुंबईने जिंकलेल्या पाच आयपीएल विजेतेपदांपैकी चार विजेतेपदांत मॅक्लेनघनचा सहभाग होता.
तर मी सगळ्या वस्तूंचा लिलाव करेल
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलपासून दूर असलेला न्यूझीलंडचा हा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्विटरवरून आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. या दरम्यान एका चाहत्याने ‘मुंबई इंडियन्स या आयपीएलमध्ये अखेरच्या स्थानी राहणार’ असे म्हटले. त्यावर उत्तर देताना मॅक्लेनघनने ‘तू वेडा आहेस का?’ असे उत्तर दिले. त्यानंतर या चाहत्याने, ‘सत्य कधीकधी दुखावते’ असे प्रत्युत्तर दिले.
चाहत्याच्या अशा उत्तरानंतर मॅक्लेनघनने हे ट्विट रिट्विट करताना लिहिले, ‘मी अस काही झाल तर माझ्याकडे असणाऱ्या सर्व क्रिकेट साहित्याचा लिलाव करून हे सर्व पैसे दान करीन.’
https://twitter.com/Mitch_Savage/status/1385227487135731717?s=19
मुंबईची संमिश्र कामगिरी
आयपीएल २०२१ मध्ये मुंबईची कामगिरी आत्तापर्यंत संमिश्र राहिले आहे. आरसीबी विरुद्ध पहिल्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यांनी विजय साजरे केले. चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘शिष्य आणि गुरुला एकत्र…’, रवी शास्त्रींनाही पडली पडीक्कल-कोहलीच्या कामगिरीची भुरळ, केलं कौतुक
किंग कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास ‘हा’ नवोदित शिलेदार उस्तुक, फोटो शेअर करत म्हणतो…
तो एकतर ७०-८० धावा करतो नाहीतर काहीच नाही; शतक झळकावणाऱ्या ‘या’ फलंदाजावर गंभीरने ओढले ताशेरे






