न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर वेस्ट इंडिजच्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) आणि भारताच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळण्यासाठी उत्सुक आहे. तो सीपीएलमध्ये बार्बाडोज ट्रायडेंट्स संघाकडून खेळतो. १८ ऑगस्टपासून सीपीएलची सुरुवात होणार आहे. सीपीएल संपताच ९ दिवसांनंतर म्हणजे १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाची संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) सुरुवात होणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे प्रवासासंबंधी घ्याव्या लागणाऱ्या काळजीविषयी न्यूझीलंडच्या वेबसाईटशी बोलताना सँटनर म्हणाला की, “हे सर्वकाही रोमांचक असेल. मी अमेरिकेवरुन वेस्ट इंडिजला जाईल. दरम्यान विमानतळावर लाऊंजच्या एका कोपऱ्यात बसून राहील. आम्हाला सध्याची परिस्थिती पाहता स्वास्थ आणि सुरक्षेसंबंधी सूचनांचे बुकलेट दिले आहे. आम्ही सरळ वेस्ट इंडिजला जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर मी माझे मित्र ड्वेन ब्राव्हो आणि ब्रेंडन मॅक्यूलम यांच्यासोबत वेळ घालवेल.” Mitchell Santner Says That He Will Sit In Corner Of Lounge Of The Airport
सँटनरने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ४ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३२ धावा आणि ४ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-फक्त ‘या’ एका कारणामुळे रिषभ पंतला मिळतात संजू सॅमसनपेक्षा जास्त संधी
-कोरोना मुळे ही लोकप्रिय लीग दुसऱ्यांदा झाली स्थगित; पुढील वर्षी होण्याची शक्यता
-आयपीएल २०२०: यंदा आयपीएल भारताबाहेर होणार म्हणून ‘या’ खेळाडूने व्यक्त केली निराशा
ट्रेंडिंग लेख –
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी
-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही