आयपीएल २०२०: युएईला जाण्यापूर्वी भारतीय खेळाडूंसाठी ‘या’ संघाला लावायचा आहे कँप

Delhi Capitals Considering Setting Up Camp For Indian Players

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामासाठी युएईला रवाना होण्यापुर्वी दिल्ली कॅपिटल्सला आपल्या संघातील भारतीय खेळाडूंसाठी दिल्लीमध्ये शिबिराचे आयोजन करायचे आहे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय उद्या (२ ऑगस्ट) होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीनंतर घेतला जाईल. Delhi Capitals Considering Setting Up Camp For Indian Players

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएसशी बोलताना म्हटले की, “बीसीसीआयने आम्हाला तारखांविषयी सांगितले आहे. परंतु आम्ही गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत पुढे येणाऱ्या नवीन माहितीची वाट पाहत आहोत. एकदा ही बैठक पार पडली की, आम्ही अंतिम निर्णय घेऊ. सध्या आम्ही १५ ऑगस्टपासून हा शिबिर आयोजण्याचा विचार करत आहोत. परंतु बैठकीनंतर यामध्ये बदल होऊ शकतात. एकदा बीसीसीआयकडून सूचना मिळाली की आम्ही तयारी सुरु करु.”

अधिकाऱ्याला जेव्हा विचारले गेले की, बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे रणनीतीवर काही फरक पडेल का?, तेव्हा ते म्हणाले की, “बैठकीत अनेक प्रकारच्या गोष्टी स्पष्ट होतील. जसे की, युएईत कशाप्रकारची व्यवस्था असेल. त्यानंतर आम्ही लगेच दिल्लीत शिबीर लावायचा का लवकरात लवकर युएईला जायचे? याविषयी विचार करु. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे की, परदेशी खेळाडू सरळ यूएईला जाणार.”

“बायो सिक्योर बबल कशाप्रकारे काम करेल, बीसीसीआयने कशाप्रकारे रोडमॅप बनवला आहे आणि आम्ही बनवलेल्या ब्लूप्रिंटला कशाप्रकारे यामध्ये सामाविष्ट करता येईल, याविषयी आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे. पण आता जशी स्थिती आहे, ती पाहता यूएईला जाण्यापूर्वी आम्ही छोट्या शिबिराच्या आयोजनावर काम करत आहोत,” असे पुढे बोलताना ते अधिकारी म्हणाले.

“अनेक भारतीय क्रिकेटपटू आपापल्या घरात बंद आहेत. त्यामुळे आमचा विचार आहे की, हळूहळू त्यांना लयीत आणायला पाहिजे. आपल्या शहरात शिबिर आयोजित केल्यास त्यांना यामध्ये मदत मिळेल.” यासंबंधी जेव्हा डीडीसीएच्या अधिकाऱ्याने आयएएनएसशी बोलताना म्हटले की, “आम्हाला दिल्ली कॅपिटल्सकडून कोणत्याही प्रकारचा संदेश देण्यात आलेला नाही. पण कोटला स्टेडियमध्ये त्यांचे स्वागत आहे. हे त्यांचे घरचे मैदान आहे. त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते इथे येऊ शकतात.”

महत्त्वाच्या बातम्या –

-कोरोना मुळे ही लोकप्रिय लीग दुसऱ्यांदा झाली स्थगित; पुढील वर्षी होण्याची शक्यता

-आयपीएल २०२०: यंदा आयपीएल भारताबाहेर होणार म्हणून ‘या’ खेळाडूने व्यक्त केली निराशा

-VIDEO: दिल्ली कॅपिटल्सचा ‘गब्बर’ धवन ने सुरू केला मैदानी सराव

ट्रेंडिंग लेख –

-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर

-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.