Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टार्क-स्टॉयनिसचा कहर! भारताने स्वस्तात गमावल्या पहिल्या चार विकेट्स

स्टार्क-स्टॉयनिसचा कहर! भारताने स्वस्तात गमावल्या पहिल्या चार विकेट्स

March 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Mitchell Starc

Photo Courtesy: Twitter/ICC


मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर पहिला वनडे सामना खेळताना भारतीय सुरुवातीच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. पण प्रत्युत्तरात भारतीय फलंदाज देखील संघाला अपेक्षित सुरुवात देऊ शकले नाहीत. भारताने पहिल्या तीन विकेट्स अवघ्या 16 धावांवर गमावल्या. तर चौथी विकेट 39 धावांवर गमावली.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि मार्कस स्टॉयनिस यांनी सुरुवातीच्या पाच षटकात संघाला या तीन विकेट्स मिळवून दिल्या. भारताला पहिला थक्का दिली तो मार्कस स्टॉयनिसने. सलामीवीर ईशान किशनल डावातील दुसऱ्याच षटकात स्टॉयनिसच्या चेंडूवर पायचीत झाला. त्यानंतकर विराट कोहली (Virat Kohli) याच्या रूपात स्टार्कने दुसरा धक्का दिला. विराटने पाचव्या षटकातील वाचव्या चेंडूवर विकेट गमावली. स्टार्कने पुढच्याच चेंडूवर म्हणजे पाचव्या षटकाती शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला चालते केले. विराट आणि सूर्यकुमार दोघांनीही आपली विकेट पायचीत होऊन गमावली.

ईशान किशनने 3, विराटने 4, तर सूर्यकुमारने एकही धाव न करता विकेट गमावली. परिणामी अवघ्या 16 धावांवर भारताचे तीन प्रमुख खेळाडू तंबूत परतले. संघाची धावसंख्या 39 धावा असताना शुबमन गिलच्या रूपात भारताला चौथा धक्का बसला. स्टार्कनेच गिलला 20 धावांवर तंबूत धाडले. उभय संघांतील हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात असून खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल दिसली. ऑस्ट्रेलियाला स्टार्क आणि स्टॉयनिसने ज्या पद्धतीची सुरुवात दिली, त्याच पद्धतीने भारतासाठी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज सर्वात फायदेशीर गोलंदाज ठरले.

Mitchell Starc is on fire! 🔥

He's also on a hat-trick next over#INDvAUS pic.twitter.com/O5hBvyyhaB

— cricket.com.au (@cricketcomau) March 17, 2023

सामना सुरू होताना भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी तीन-तीन विकेट्स शमी आणि सिराजने घेतल्या. तसेच रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या आणि गुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजी करातना सलामीवीर मिचेल मार्श याने 81 धावांची सर्वात मोठी खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा एकही फलंदाज 30 धावांची खेळीही करू शकला नाही. परिणामी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 188 धावा करून 35.4 षटकात सर्व विकेट्स गमावल्या.
(Mitchell Starc and Marcus Stoinis took India’s three most important wickets in the opening overs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ओह, हमें तुमसे मोहब्बत है…’, कांगारूंना 188 धावांवर लोळवताच ट्विटरवर झळकला मोहम्मद शमी
सिराज-शमीपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण! टीम इंडियासमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान


Next Post
Arshdeep Singh

टीम इंडियातून डच्चू मिळताच अर्शदीपने गाठले इंग्लंड! 'या' संघासाठी दाखवणार दम

Ishan-Kishan

द्विशतकानंतर ईशान किशनची बॅट शांतच, मागच्या 10 डावांमध्ये चाहत्यांची निराशा

Photo Courtesy: Twitter

आरआरआर फिवर ऑन! चालू सामन्यात नाटू-नाटू गाण्यावर थिरकले विराटचे पाय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143