भारतीय महिला संघाची महान कर्णधार मिताली राज हिने बुधवारी (८ जून) तिच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिली. मितालीने बुधवारी अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ती निवृत्ती घेत असल्याचे घोषित केले. मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने अनेक महत्वाच्या मालिका आणि सामने जिंकले आहेत. तिची क्रिकेट कारकीर्द दिग्गज सचिन तेंडुलकर पेक्षा मोठी ठरली आहे.
मिलाती राज (Mithali Raj) जागतिक क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. बुधवारी तिने स्वतःच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक पोस्ट केली आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे घोषित केले. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात मोठी एकदिवसीय कारकीर्द ही मिताली राजचीच ठरली आहे. मिलाती तब्बल २२ वर्ष आणि २७४ दिवस एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तिच्यापेक्षा जास्त दिवस इतर कोणताही खेळाडू एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाहीये. दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देखील मिताली राजपेक्षा कमीच दिवस क्रिकेट खेळला आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात मोठी एकदिवसीय कारकीर्द असणाऱ्यांमध्ये मिताली पहिल्या, तर सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनची कारकीर्द २२ वर्ष आणि ९१ दिवस आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सनथ जयसूर्या आहे. जयसूर्या तब्बल २१ वर्ष आणि १८४ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. यादीत चौथा क्रमांक आहेत जावेद मियाँदाद, ज्यांनी तब्बल २० वर्ष आणि २७२ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. भारतीय महिला संघाची दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ती मागच्या २० वर्ष आणि ७५ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.
सर्वात मोठी एकदिवसीय कारकीर्द असणारे क्रिकेटपटू (महिला आणि पुरुष दोन्ही)
२२ वर्ष २७४ दिवस – मिताली राज*
२२ वर्ष ९१ दिवस – सचिन तेंडुलकर
२१ वर्ष १८४ दिवस – सनथ जयसुर्या
२० वर्ष २७२ दिवस – जावेद मियॉंदाद
२० वर्ष ७५ दिवस – झुलन गोस्वामी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उमरान मलिक पदार्पण करणार? कर्णधार रिषभ पंतने दिले संकेत
पंत कर्णधार बनताच गर्लफ्रेंडचा ‘खास संदेश’ चर्चेत, काय म्हणाली एकदा पाहाच
भविष्यात ‘हा’ फलंदाज बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, हरभजन सिंगने दिले संकेत