आयपीएलच्या 14 व्या सत्राला सुरूवात झाली असून या स्पर्धेत केवळ क्रिकेटच नाही तर महिला अँकरचीही बरीच चर्चा आहे. यामध्ये अँकर संजना गणेशन हिच्यासाठी हे सत्र खूप खास आहे. कारण मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत लग्नानंतर हे तिचे पहिले आयपीएल पर्व आहे.
शुक्रवार रोजी (०९ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात अँकरिंग करताना संजनाने नेव्ही ब्लू कलरचा ड्रेस परिधान केला होता. त्याबरोबर तिने एका हातात ब्रेसलेट आणि दुसर्या हातात घड्याळ घातले होते.
विशेष म्हणजे, संजना गणेशनचा पती जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे आणि या संघाच्या जर्सीचा रंग निळा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या या हंगामातील पहिल्याच सामन्यात संजनाने निळा ड्रेस परिधान केल्याने चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
#SabKuchRoKo 'cuz it's #MIvRCB on #VIVOIPL 2021 Day 1, and @SanjanaGanesan is ready to roll! 👊
Drop your wildest prediction for the match below and tune in:#Byjus #CricketLive | 6 PM | Star Sports & Disney+Hotstar VIP#IndiaKaApnaMantra pic.twitter.com/EAUoCF4UFI
— Star Sports (@StarSportsIndia) April 9, 2021
Happy to see you on byjus cricket Live @mipaltan @Jaspritbumrah93 @SanjanaGanesan pic.twitter.com/F1S5U4IAPx
— ROHIT SHARMA -THE HITMAN KI DUNIYAA (@HITMANuniyaa45) April 9, 2021
एका चाहत्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, बुमराह आणि मुंबईला साथ देण्यासाठी संजनाने या संघाच्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच, त्या चाहत्याने एक मिम्स शेअर करत ‘हेच खरे प्रेम (True Love)’ असे म्हटले आहे.
https://twitter.com/amargautam909/status/1380521468241530882?s=20
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएल २०२१ च्या सलामी सामन्यात संजना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये अँकरिंग करताना दिसली. यासाठी तिला एका स्टुडिओमधून दुसर्या स्टुडिओमध्ये जावे लागत होते. यावर तीनेही एक मिम्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने स्टुडिओ बदलण्यासाठी कशी धावपळ करावी लागत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Accurate representation. 🤙🏼 https://t.co/sRLL2RYvC4
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) April 9, 2021
आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यात बेंगलोरने मुंबईला २ विकेट्सने पराभवाची धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगलोरने ८ विकेट्स गमावत मुंबईचे लक्ष्य पूर्ण केले. बेंगलोरचा अष्टपैलू हर्षल पटेल सामन्याचा नायक ठरला. २७ धावांवर ५ विकेट्स आणि संघाला विजयी धाव घेत सामना जिंकून देण्याची कामगिरी त्याने केली. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
वानखेडेत सामना पाहण्यासाठी बीसीसीआयने केली कोरोना टेस्ट बंधनकारक
बलाढ्य MI साठी कर्दनकाळ ठरला हर्षल; सामना विजयानंतर म्हणाला, ‘मला आधीच कल्पना आली होती…’