---Advertisement---

“आता मी याला फ्रेम करणार,” आरसीबीच्या कर्णधाराकडून युवा खेळाडूला आकर्षक भेट

On: गुरूवार, मे 13, 2021 10:11 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. एकापाठोपाठ एक खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने बीसीसीआयने, आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वच खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. अशातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फलंदाज मोहम्मद अजहरुद्दिन याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला जो प्रचंड व्हायरल होत आहे.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२२ च्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली होती.या संघात केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अजहरुद्दिन याला संधी देण्यात आली होती. परंतु सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही. अशातच विराट कोहलीने त्याला एक भेट दिली होती. जे पाहून मोहम्मद अजहरुद्दिनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विराटने त्याला आपली स्वाक्षरी असलेली जर्सी भेट म्हणून दिली होती. या अविश्वसनीय क्षणाचा फोटो त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यावर त्याने कॅपशन म्हणून, “या जर्सीला मी फ्रेम करून ठेवणार”, असे लिहिले होते.

https://www.instagram.com/p/COxFulgrUaG/?utm_source=ig_embed

मोहम्मद अजहरुद्दिनने या वर्षी जानेवारी महिन्यात पार पडलेल्या सैयद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. याच बळावर त्याची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात निवड झाली होती. या संघासाठी देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली हे डावाची सुरुवात करतात आणि दोघेही चांगल्याच फॉर्म मध्ये असल्यामुळे मोहम्मद अजहरुद्दिनला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबई संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले होते.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आयपीएल २०२१ स्पर्धा ,येत्या सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात येऊ शकते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची, या हंगामातील कामगिरी उल्लेखनीय होती. त्यांनी या हंगामात आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. यात त्यानं ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

बहुप्रतीक्षित अ‍ॅशेस मालिकेचे वेळापत्रक आले समोर, या तारखेला होणार सुरुवात

रैनापाठोपाठ सोनू सूदची भज्जीला मदत, ही गरज केली पूर्ण

केवळ एक आंतरराष्ट्रीय सामना खेळूनही ठरला क्रिकेटर ऑफ द इयर, पाहा डोळे दिपवणारी आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---