भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याचे म्हणणे आहे की, भारतात सातत्याने विराट कोहली आणि एमएस धोनीसारख्या फलंदाजांची चर्चा होत असते. परंतु वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह असा खेळाडू आहे, जे सातत्याने दबावाच्या परिस्थितीतही चांगले प्रदर्शन करत असतो. तसेच कैफचे असेही म्हणणे आहे की, बुमराहचा भारतीय संघाच्या परदेशातील कसोटी विजयांमध्ये मोठा हात राहिला आहे.
स्पोर्ट्सकीडाशी बोलताना कैफला (Mohammad Kaif) आशियातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू (Best Cricketer In Asia) निवडायला सांगितले गेले. यावर बोलताना कैफ म्हणाला की, “हे सांगणे खूप कठिण आहे. परंतु मला बुमराह (Jasprit Bumrah) खूप आवडतो. लोक कोहलीपासून ते धोनीपर्यंत फलंदाजांबद्दल खूप चर्चा करतात. ते सर्वजण महान खेळाडू आहेत. परंतु बुमराहसारखा दुसरा कोणी नाही. त्याचा स्वभाव खूप शांत आहे आणि तो दबावातही काम करत राहातो, जे की आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहिले आहे. तो क्रिकेटच्या सर्व प्रकारातील खेळाडू म्हणून पुढे आला आहे. त्याच्या येण्याने भारतीय संघाच्या परदेशातील कसोटी विजयांची टक्केवारी वाढण्यात मोठी मदत मिळाली आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
कैफने बुमराहनंतर पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) आशियातील दुसरा सर्वात आवडता क्रिकेटपटू म्हटले आहे. आझम गेल्या काही महिन्यांपासून कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन करतो आहे. याच कारणास्तव त्याला मार्च महिन्यातील आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला होता.
आझमचे कौतुक करताना कैफ म्हणाला की, “पाकिस्तानजवळ खरी प्रतिभा आहे आणि काही शानदार खेळाडूही आहेत. यापैकीच एक आहे बाबर आझम. मला शाहीन आफ्रिदीही फार आवडतो. परंतु मी आझमलाच निवडेल. तो सातत्याने मोठ्या धावा करत आहे. परंतु अद्याप त्याच्या प्रदर्शनाची तितकी स्तुती झालेली नाही. परंतु माझ्या मते, तो पाकिस्तानकडून आधीपासूनच फार चांगले क्रिकेटपटू खेळले आहेत.”
आझमने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ४० सामने खेळताना २८५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६ शतके आणि २१ अर्धशतके निघाली आहेत. तर बुमराहनेही २९ सामने खेळताना १२३ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जो रुटने तर नेतृत्व सोडले, आता कोण होणार इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार? ‘हे’ आहेत चार पर्याय
बटलरने भिरकावला गगनचुंबी षटकार, पण पुढच्याच चेंडूवर फर्ग्यूसनने असा काढला काटा; VIDEO VIRAL
एकच तर हृदय आहे, कितीदा जिंकशील! चौकार मारल्यानंतर हार्दिकने गोलंदाज प्रसिद्धची मागितली क्षमा