भारत विरुद्ध लिसेस्टरशायर सराव सामना लिसेस्टर ग्राउंड येथे सुरू आहे. गुरूवारी (२३ जून) सुरू झालेल्या या सामन्याचा हा दुसरा दिवस आहे. यामध्ये भारतीय संघाचे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे चार खेळाडू लिसेस्टरशायरकडून खेळत आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने (Mohammed Shami) पुजाराला बाद केल्यावर त्याचे सेलेब्रेशन केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लिसेस्टरशायरचा गोलंदाज रोमन वॉकरने भेदक गोलंदाजी करत भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला. भारताने पहिला डाव २४६ धावा असताना घोषित केला. यावेळी शमीने गोलंदाजीला येताना संघाला दोन झटपट विकेट्स मिळवून दिल्या. त्यातील विरोधी संघाचा कर्णधार सॅम्युअल इव्हान्सला बाद करत पहिले यश मिळवले. नंतर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराला शून्यावरच त्रिफळाचीत केले. या विकेटचा शमीला इतका आनंद झाला की त्याने थेट पुजाराची गळाभेट घेतली आहे. हा व्हिडिओ लिसेस्टरशायरने ट्वीटरवर शेयर केला आहे.
☝️ | 𝐏𝐮𝐣𝐚𝐫𝐚 𝐛 𝐒𝐡𝐚𝐦𝐢.
A second wicket for Shami. He dismisses his @BCCI teammate, as Pujara drags on.
Evison joins Kimber (28*).
🦊 LEI 34/2
𝐋𝐈𝐕𝐄 𝐒𝐓𝐑𝐄𝐀𝐌: https://t.co/APL4n65NFa 👈
🦊 #IndiaTourMatch | #LEIvIND | #TeamIndia pic.twitter.com/ANf2NfhUAy
— Leicestershire CCC 🏏 (@leicsccc) June 24, 2022
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असता भारताने पहिला डाव घोषित केला आहे. शमीबरोबरच मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने देखील दोन विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा यष्टीरक्षक केएस भरत याने केल्या आहेत. त्याने नाबाद ७० धावा केल्या आहेत.
हा सराव सामना संपल्यावर भारत १ जुलैला इंग्लड विरुद्ध एजबस्टन ग्राउंड, बर्मिंघम येथे कसोटी सामना खेळणार आहेत. हा सामना मागील वर्षाच्या पाच कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आहे. कोरोनामुळे भारतीय संघ अर्ध्यातच मालिका सोडून मायदेशी परतला होता. या मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर आहे.
विदेशी मैदानावर कसोटीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची रोहितची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यात त्याने बुमराहच्या जलद गतीच्या चेंडूंचा सामना केला. एका चेंडूने त्याला जवळपास जखमीच केले असते. तो थोडक्यात बचावला असून त्याने पुढे फलंदाजीही केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला दिलासा, विराट-रोहितचा घाम काढणारा इंग्लिश गोलंदाज वनडे, टी२० मालिकेला मुकणार?
इनस्विंग बॉलवर शार्दूलने आपली विकेट केली बहाल, पाहा व्हिडिओ
बड्डे स्पेशल: फुटबॉलसाठीच जन्मलेला मेस्सी, वाचा त्याचे आश्चर्यकारक विक्रम