आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. आधी जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेरा याला पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर केएल राहुल याच्या हातून झेलबाद केले होते. त्यानंतर आता मोहम्मद सिराज या भेदक गोलंदाजानेही भारताला एक नाही, तर 3 विकेट्स मिळवून दिल्या.
सिराजने एका षटकात घेतल्या चार विकेट्स
झाले असे की, मोहम्मद सिराज वैयक्तिक दुसरे आणि डावातील चौथे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने यावेळी पहिल्याच चेंडूवर पथुम निसांका याला 2 धावांवर रवींद्र जडेजा याच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिराजने सदीरा समरविक्रमा याला शून्यावर तंबूत धाडले. विशेष म्हणजे, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चरिथ असलंका यालाही सिराजने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद केले.
Make that FOUR wickets in an over 🤯
🔝 bowling this from @mdsirajofficial 😎#TeamIndia on a roll with the ball and Sri Lanka are 12/5.
Follow the match ▶️ https://t.co/xrKl5d85dN#AsiaCup2023 | #INDvSL https://t.co/eB1955UBDo pic.twitter.com/kaZcVOk1AZ
— BCCI (@BCCI) September 17, 2023
हे तर काहीच नाही, सिराजने पाचव्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर सहाव्या चेंडूवर पुन्हा विकेट घेतली. त्याने धनंजय डी सिल्वा या फलंदाजाला 4 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे सिराजने अवघ्या 1 षटकात 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला.
Siraj in the first 10 balls:
0, 0, 0, 0, 0, 0, W, 0, W, W. pic.twitter.com/HBW1q3pZee
— Johns. (@CricCrazyJohns) September 17, 2023
विशेष म्हणजे, आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. सिराजने त्याचे पहिले षटक निर्धाव टाकले होते. तसेच, दुसऱ्या षटकातील चार चेंडूत 3 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे त्याने 10 चेंडूत एकही धाव न देता 3 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला.
Make that FOUR wickets in an over 🤯
🔝 bowling this from @mdsirajofficial 😎#TeamIndia on a roll with the ball and Sri Lanka are 12/5.
Follow the match ▶️ https://t.co/xrKl5d85dN#AsiaCup2023 | #INDvSL https://t.co/eB1955UBDo pic.twitter.com/kaZcVOk1AZ
— BCCI (@BCCI) September 17, 2023
अशाप्रकारे श्रीलंकेने पहिल्या 4 षटकात 12 धावांवर आपल्या महत्त्वाच्या 5 विकेट्स गमावल्या. (Mohammed Siraj taken 4 wickets in an over asia cup 2023 final ind vs sl)
आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यासाठी उभय संघ
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका संघ
पथुम निसांका, कुशल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना
हेही वाचा-
पहिल्याच षटकात बुमराहचा श्रीलंकेला दणका! विस्फोटक सलामीवीर दोन चेंडूत OUT
Asia Cup 2023: कॅप्टन रोहितने गमावला टॉस, भारताच्या 5 वाघांचे Finalमध्ये कमबॅक