अमेरिका क्रिकेटने (USA Cricket) भारतीय वंशाचा यष्टिरक्षक फलंदाज मोनांक पटेलला वनडे संघाचे कर्णधारपद दिले आहे. त्याला ही जबाबदारी सौरभ नेत्रवलकरच्या (Saurabh Netravalkar) जागी देण्यात आली आहे. मोनांक पटेल (Monank Patel) आगामी काळात अमेरिका क्रिकेटचे नेतृत्व करेल. तर मध्यक्रमातील फलंदाज ऍरॉन जोंसला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, सौरभ याला कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला की त्याने स्वतःहून नेतृत्व सोडले हे सांगितले गेले नाही. मोनांक ऑक्टोबर महिन्यात संघाचा टी२० कर्णधार म्हणून नियुक्त झाला होता. (Monank Patel New USA Cricket Team Captain)
सौरभ नेत्रवलकरच्या नेतृत्वाखाली अमेरिका संघाने आयसीसी टी२० विश्वचषक लीग स्पर्धेतील ९ पैकी ८ सामने गमावले होते. तर एकाच सामन्यात अमेरिका संघाला विजय मिळवण्यात यश आलेले. तर कॅनडा आणि बर्मुडा यांनी अमेरिका संघाला २ वेळेस पराभूत केले होते. ज्यामुळे अमेरिका क्रिकेट त्याच्यावर लक्ष ठेवून होते. एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, सौरभ याने स्वतः गोलंदाजीवर लक्ष करण्यासाठी नेतृत्व सोडण्याचा निश्चय केला होता, असे सांगण्यात येत आहे.
सौरभ याने नवनियुक्त कर्णधार मोनांक याला शुभेच्छा देताना म्हटले,
“मी मोनांक व ऍरॉन यांना शुभेच्छा देतो. भारतात २०२३ मध्ये होणारा वनडे विश्वचषक खेळणे आमचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही अधिक परिश्रम घेऊ.”
सौरभ नेत्रवळकर याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच, विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकलेल्या २००८ एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकातील संघात त्याचा समावेश होता.
अमेरिकेचा टी२० संघ-
मोनांक पटेल (कर्णधार), ऍरॉन जोंस (उपकर्णधार), अली खान, गजानंद सिंह, जसदीप सिंह, जसकरण मल्होत्रा, करीमा गोर, मार्टी कैन, निसर्ग पटेल, रस्टी थेरॉन, सौरभ नेत्रवलकर, स्टीवन टेलर, वत्सल वाघेला, जेवियर मार्शल, रिजर्व: काइल फिलिप
अमेरिकेचा वनडे संघ-
मोनांक पटेल (कर्णधार), ऍरोन जोंस (उपकर्णधार), अली खान, गजानंद सिंह, जसकरण मल्होत्रा, जसदीप सिंह, निसर्ग पटेल, नोस्टश केंजीगे, राहुल जरीवाला, सौरभ नेत्रवलकर, स्टीवन टेलर, सुशांत मोदानी, वत्सल वाघेला, जेवियर मार्शल, रिजर्व: काइल फिलिप
महत्त्वाच्या बातम्या-
हुर्रे! काश्मिरच्या ‘या’ स्थानिक क्रिकेटरची लागली लॉटरी, रोहितच्या मुंबईकडून ट्रायलसाठी आलं बोलावणं
दुसरा ऍशेस सामना डेविड वॉर्नर खेळणार का? पॅट कमिन्सने दिली महत्त्वाची माहिती