---Advertisement---

विलियम्सनचा शतकी तडाखा! स्टिफन फ्लेमिंगच्या ‘या’ विक्रमालाही दिला धक्का

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 12:51 PM
---Advertisement---

ख्राइस्टचर्च। रविवारपासून(३ जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. हा सामना हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर होत असून या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने शतकी खेळी केली आहे.

न्यूझीलंडकडून पहिल्या डावात केन विलियम्सन दुसऱ्या दिवसाखेर १७५ चेंडूत ११२ धावा करुन नाबाद आहे. त्याने या खेळीत १६ चौकार मारले आहेत. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.

विलियम्सनने फ्लेमिंगला टाकले मागे –

कसोटीमध्ये ५० धावांचा टप्पा ओलांडण्याची विलियम्सनची ही ५६ वी वेळ आहे. यात त्याच्या २४ शतकांचा आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे विलियम्सन न्यूझीलंडकडून सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. त्याने स्टिफन प्लेमिंग यांना मागे टाकले आहे.

फ्लेमिंग यांनी कसोटीत ५५ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. त्यांच्या पाठोपाठ रॉस टेलर असून त्याने ५३ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

कसोटीत सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे न्यूझीलंडचे खेळाडू –
५६ – केन विलियम्सन
५५ – स्टिफन फ्लेमिंग
५३ – रॉस टेलर
४३ – ब्रेंडन मॅक्यूलम
३५ – नॅथन ऍस्टल
३५ – मार्टिन क्रो

दुसऱ्या दिवसाखरे न्यूझीलंडचे वर्चस्व –

या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव २९७ धावांवर संपुष्टात आला होता. त्यांच्याकडून अझर अलीने ९३ आणि कर्णधार मोहम्मद रिझवानने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच फहिम अश्रफने ४८ धावा करत योगदान दिले. तसेच न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काईल जेमिसनने पहिल्या डावात सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची टॉम लॅथम(३३) आणि टॉम ब्लंडेल(१६) ही सलामी जोडी लवकर बाद झाली. तसेच रॉस टेलरही(१२) स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर विलियम्सनने हेन्री निकोल्सला साथीला घेत न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या दिवसाखेर नाबाद २१५ धावांची भागीदारी रचली आहे. विलियम्सनसह निकोल्स ८९ धावांवर नाबाद खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

केन विलियम्सनचा पुन्हा शतकी धमाका! ‘हा’ विक्रम करत विराटलाही टाकलंय मागे

सौरव गांगुलीला येत्या २-३ दिवसांत मिळणार डिस्चार्ज? रुग्णालयाने दिले हेल्थ अपडेट

“दर्शक स्टेडियममध्ये आणि आम्ही मात्र क्वारंटाइन, ही कसली वागणूक?” टीम इंडियाचा आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---