एशिया कप स्पर्धेतील सुपर फोरच्या दुबईत झालेल्या कालच्या (23 सप्टेंबर)सामन्यात भारताने पाकिस्तानवर 9 विकेट्सने विजय मिळवत आपले स्पर्धेतील वर्चस्व सिध्द केले.
या सामन्यात पाकिस्ताने दिलेल्या 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनने द्विशतकी भागीदारी रचली.
रोहितने 119 चेंडूत 111 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 7 चौकार मारले. त्याचा सलामीचा जोडीदार शिखर धवनने 114 धावांची आक्रमक खेळी केली.
या सामन्यात विक्रमवीर रोहितने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. एक महत्वाचा विक्रम म्हणजे वनडेत सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या भारतीयांच्या यादीत तो आता 4 चौथ्या क्रमांकावर आला आहे.
एशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची कर्णधार पदाची धुरा संभाळणाऱ्या रोहितचे नाव आता सचिन तेंडूलकर, विराट कोहली आणि सौरव गांगुली या दिग्गजांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
भारताकडून वनडेत सर्वाधिक शतके मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. त्याने 49 शतके केली आहेत. तर या यादीत विराट कोहली 35 शतकांसह दुसऱ्या आणि सौरव गांगुली 22 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यांच्यानंतर रोहित 19 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
त्याच्यानंतर 5 व्या क्रमांकावर त्याचा सलामीचा जोडीदार शिखर धवन आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर प्रत्येकी 15 शतके आहे.
सर्वाधिक शतक करणारे भारतीय फलंदाज-
49 शतके – सचिन तेंडूलकर
35 शतके – कोहली कोहली
22 शतके – सौरव गांगुली
19 शतके – रोहित शर्मा
15 शतके – वीरेंद्र सेहवाग/ शिखर धवन
महत्वाच्या बातम्या –
–एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दारुण पराभव
–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले
-पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर