जगप्रसिद्ध अशी टी२० लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लवकरच चौदाव्या पर्वात प्रवेश करणार आहे. आतापर्यंत आयपीएलचे १३ पर्व पार पडले आहेत. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. चेन्नई येथे गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात या पर्वाची पहिली लढत रंगणार आहे.
कोरोनाच्या सावटाखाली सलग दुसऱ्या वर्षी विनाप्रेक्षक आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. गतवर्षी कोविड-१९ मुळे संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा बंद दाराआड खेळवण्यात आली होती. असे असले तरीही, आयपीएलप्रेमी आणि सर्व सहभागी खेळाडूंचा उत्साह तसूभरही कमी झाल्याचे दिसत नाही.
सर्व फ्रँचायझी नव्या उत्साहासह आणि नव्या स्वप्नांसह मैदानावर उतरणार आहेत. त्यातही मागील १३ पर्वांपासून आयपीएल चषकावर आपले नाव कोरण्याच्या प्रतिक्षेत असणारे संघ यंदा पुन्हा एकदा नशीब आजमावताना दिसणार आहेत. येथे आपण आयपीएलचे सर्वाधिक हंगाम खेळणारे परंतु एकदाही जेतेपद न जिंकू शकणाऱ्या फ्रँचायझींविषयी चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करुया…
एकदाही ट्रॉफी न जिंकला सर्वाधिक हंगाम खेळणारे संघ (Most IPL Season Without Winning IPL Trophy)-
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात एकदाही विजेतेपद मिळवलेले नाही. यापुर्वी २०१६ साली सनरायझर्स हैदराबाद, २०११ साली चेन्नई सुपर किंग्स आणि २००९ साली डेक्कन चार्जर्सने अंतिम सामन्यात बेंगलोरला नमवले होते. त्यामुळे आतापर्यंत तीन वेळा या संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले आहे.
आयपीएल २०२० मध्ये तर त्यांचा प्रवास एलिमिनेटर सामन्यातच संपला होता. या ‘करा वा मरा’ स्थितीचा असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६ विकेट्सने मात दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा बेंगलोर संघाचे चषक पटकावण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते.
बेंगलोरव्यतिरिक्त किंग्स इलेव्हन पंजाबनेही आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक जिंकलेला नाही. ते केवळ २०१४ साली उपविजेते ठरले होते. गतवर्षी त्यांचा प्रवास प्लेऑफपुर्वीच संपला होता. त्यामुळे एकदाही चषकावर आपले नाव कोरता आयपीएलचे आतापर्यंतचे सर्व १३ हंगाम खेळण्याचा लाजिरवाणा विक्रम या २ संघांच्या नावे नोंदला गेला आहे.
बेंगलोर आणि पंजाबव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स (आधीचे नाव दिल्ली डेअरडेविल्स) या संघानेही आत्तापर्यंत १३ हंगाम खेळलेले आहेत. तसेच त्यांनाही पहिल्या १२ हंगामात आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. आयपीएल २०२० च्या पूर्ण हंगामात दमदार कामगिरी करत दिल्लीने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सने त्यांना विजयाचा स्वाद चाखू दिला नव्हता.
सध्या आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या ८ संघापैकी बेंगलोर, पंजाब आणि दिल्ली या तीन संघांव्यतिरिक्त इतर संघांनी १३ हंगामांमध्ये एकदा तरी आयपीएल चषक पटकावला आहे. मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ५ वेळा हा पराक्रम केला आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने ३ वेळा, कोलकाता नाईट रायडर्सने २ वेळा, राजस्थान रॉयल्सने १ आणि सनरायझर्स हैदराबादने १ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तसेच डेक्कन चार्जर्स या संघानेही एकदा आयपीएल विजेतेपद मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई हारली परंतू आपला ऋतुराज जिंकला, पुण्यात येताच झाला मोठा सन्मान
‘दीदी याला आता तूच समजावून सांग,’ पंतच्या बहिणीकडे चाहत्याची अजब मागणी
दुर्दैवच म्हणायचं अन् काय! फ्री हीट असनूही फलंदाज झाला बाद, पाहा कसं
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०मध्ये नाही चालली ‘या’ फलंदाजांची जादू, षटकार मारण्यातही ठरले अपयशी
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा