गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) सिडनी येथे टी20 विश्वचषकात भारत विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांच्या अफलातून योगदानामुळे संघाने शानदार विजय साकारला. भारताने हा सामना 56 धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने खास कामगिरी करत आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली. काय आहे त्याचा विक्रम चला जाणून घेऊया…
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 179 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना नेदरलँड्स संघाला अपयश आले. त्यांना यावेळी 20 षटकात 9 विकेट्स गमावत 123 धावाच करता आल्या. त्यामुळे विश्वचषकातील हा त्यांचा पहिल्या दोन विजयानंतर सलग तिसरा पराभव होता. नेदरलँड्सच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडण्याचे काम भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने केले. यावेळी त्याने खास कारनामाही केला.
At the end of the powerplay, Netherlands are 27/2.
Live – https://t.co/GVdXQKGVh3 #INDvNED #T20WorldCup pic.twitter.com/C6lupDAMOd
— BCCI (@BCCI) October 27, 2022
भुवनेश्वरने त्याची पहिली आणि दुसरी अशी सलग दोन षटके निर्धाव (मेडन) टाकली. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकापेक्षा अधिकवेळा सलग दोन निर्धाव षटके टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला. नेदरलँड्सपूर्वी त्याने 2016मध्ये यूएईविरुद्ध असा कारनामा केला होता. याव्यतिरिक्त त्याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचीही बरोबरी केली.
बुमराहच्या विक्रमाशी बरोबरी
भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकूण 9 निर्धाव षटके टाकली आहेत. यामध्ये तो जसप्रीत बुमराह याच्यासोबत संयुक्त अव्वलस्थानी आहे. त्याच्यानंतर या यादीत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी असणाऱ्या खेळाडूंमध्ये श्रीलंकेचा नुवान कुलसेकरा आणि बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान यांचा समावेश आहे. नुवान आणि मुस्तफिजूर यांनी प्रत्येकी 6 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये निर्धाव षटके टाकली आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारे गोलंदाज
9 षटके- जसप्रीत बुमराह
9 षटके- भुवनेश्वर कुमार*
6 षटके- नुवान कुलसेकरा
6 षटके- मुस्तफिजूर रहमान
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिंकलो रे! नेदरलँड्सला पराभूत करत भारताची विजयी घोडदौड सुरूच, 56 धावांनी सामना घातला खिशात
सूर्या भाऊंनी गाजवलं 2022 वर्ष! विराटच्याही एक पाऊल पुढं निघाला पठ्ठ्या, पाहा काय केलाय विक्रम






