क्रिकेटप्रेमींचा रविवार (दि. 20 नोव्हेंबर) एकदम मजेत गेला असणार यात काही शंकाच नाही. कारण, भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला माऊंट माँगनुई येथे दुसऱ्या टी20 सामन्यात 65 धावांनी धूळ चारत विजय मिळवला. या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यादव सर्व गोलंदाजीवर भारी पडला. त्याने झुंजार शतकी खेळी करत सामनावीर पुरस्कार मिळवला. यासह सूर्यकुमारने एका विक्रमात विराट कोहली याला मागे टाकले.
सूर्यकुमारचा विक्रम
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 51 चेंडूत 111 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 6 षटकार आणि 11 चौकारही मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 217.64 इतका होता. या सामन्यातील खेळीसाठी सूर्यकुमार यादव प्लेअर ऑफ द मॅच (Suryakumar Yadav Player of The Match) म्हणून निवडला गेला. यासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
A special knock from Surya Kumar Yadav earns him the ANZ Player of the Match award 🏆 #NZvIND #CricketNation pic.twitter.com/2FfFzVqlnZ
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 20, 2022
भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादव अव्वलस्थानी आला. त्याने विराट कोहली यालाही मागे टाकले आहे. सूर्यकुमारने 2022 या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक 7 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने अशी कामगिरी 2016मध्ये केली होती. विराटने त्यावेळी तब्बल 6 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला होता.
TAKE A BOW! 🙌
Suryakumar Yadav brings up his second T20I hundred 💥
Watch the #NZvIND series live on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺 pic.twitter.com/nfullD65Ww
— ICC (@ICC) November 20, 2022
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू
7 वेळा- सूर्यकुमार यादव (2022)*
6 वेळा- विराट कोहली (2016)
सामन्याचा आढावा
भारतीय संघाने दिलेल्या 192 धावांचे आव्हान न्यूझीलंड संघाला पार करता आले नाही. न्यूझीलंडचा डाव 18.5 षटकात 126 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला या सामन्यात 65 धावांनी विजय मिळवण्यात यश आले. या सामन्यात न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सन याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 52 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 4 चौकारही मारले.
भारत आणि न्यूझीलंड संघातील पुढील सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) मॅकलीन पार्क येथे होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध 32 चेंडूत अर्धशतक, पुढच्या 17 चेंडूत शतक; सूर्यकुमार यादवने लावली विक्रमांची रांग
भारताच्या क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ विलक्षण घटना, सलामीला पहिल्यांदाच..