आजपर्यंत जगात तब्बल ८४ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्थातच वनडे, कसोटी व टी२० यांचा समावेश असतो. तर भारताकडून १३ खेळाडूंना अशी कामगिरी करता आली आहे.
भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सर्वाधिक अर्थातच ६६४ सामन्यात ४८.५२च्या सरासरीने ३४३५७ धावा केल्या आहेत. सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही जगात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिला आहे.
परंतु आज आपण असे तीन खेळाडू पहाणार आहोत जे मराठी आहेत व ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
सचिन तेंडूलकर-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सर्वाधिक अर्थातच ६६४ सामन्यात ४८.५२च्या सरासरीने ३४३५७ धावा केल्या आहेत. सचिनचा जन्म मुंबईचा असून तो मुंबईकडून रणजी सामने खेळला आहे. सचिनच्या या धावांत वनडे व कसोटीचा मोठा वाटा आहे तर टी२०मध्ये सचिनने १० धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा-
२००७मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रोहितने आतापर्यंत ३६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४४.३९च्या सरासरीने १४०२९ धावा केल्या आहेत. रोहितने या धावा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये केल्या आहे.
सुनिल गावसकर-
लिटील मास्टर सुनिल गावसकर यांनी १९७१ ते १९८७ या काळात क्रिकेट कारकिर्द घडवली. यात त्यांनी २२३ सामने खेळताना ४६.२०च्या सरासरीने १३२१४ धावा केल्या. तेव्हा टी२० क्रिकेट नसल्याकारणाने त्यांना या प्रकारात मात्र नशिब आजमवता आले नाही. गावसकरांच्या सर्वाधिक धावा या कसोटीत क्रिकेटमधल्या असून त्यांनी या प्रकारात १०१२२ तर वनडेत ३०९२ धावा केल्या आहे.
दिलीप वेंगसरकर-
वेंगसरकरांनी भारताकडून २४५ सामन्यांत ३९.३०च्या सरासरीने एकूण १०३७६ धावा केल्या आहेत. त्यांची कारकिर्द १९७६ ते १९९२ अशी राहिली. ते भारतीय संघाचे कर्णधारही राहिले आहेत. त्यांच्या आंतरराष्ट्रीय १०३७६ धावांतील ६८६८ धावा कसोटीतील व ३५०८ धावा वनडेतील आहेत.
रहाणेलाही आहे संधी-
सध्या महाराष्ट्रातील केवळ अजिंक्य रहाणेला हा पराक्रम करण्याची मोठी संधी आहे. रहाणेने १७५ सामन्यांत ७५४० धावा केल्या आहेत. रहाणेचे सध्याचे वय ३२ वर्ष आहे. त्यामुळे त्याला हा विक्रम करण्याची ५०-५० संधी आहे.
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या-
–तर आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातील या ४ स्टेडियमवर होणार
–या ५ खेळाडूंना आहे वनडेत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय
–वनडेत १० हजार धावा, १०० विकेट व १०० झेल घेणारे फक्त ६ खेळाडू, दोन आहेत भारतीय