भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) प्रमुख स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे. रोहितने आतापर्यंत 30 डावांमध्ये 1150 धावा केल्या आहेत आणि या कामगिरीने त्याने भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना मागे टाकले आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार सौरव गांगुली आहे, ज्याने केवळ 20 डावांमध्ये 1046 धावा केल्या होत्या. गांगुलीनंतर महेंद्रसिंग धोनी 1037 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. धोनीने 46 डावांमध्ये या धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर विराट कोहली असून त्याने 17 डावांमध्ये 769 धावा केल्या आहेत. भारताचा आणखी एक माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन 22 डावांमध्ये 637 धावा करून या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा हा केवळ भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार नाही, तर एक जबाबदार फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. आयसीसी स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. त्याने टीम इंडियाला अनेक वेळा कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. रोहितचा स्ट्राइक रेट आणि त्याच्या खेळण्याची शैली भारतीय संघासाठी नेहमीच फायदेशीर ठरली आहे.
रोहित शर्मा सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून आगामी ICC स्पर्धांमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. भारताला पुढील काही वर्षांत मोठ्या ICC स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी करायची असल्यास, रोहितच्या नेतृत्वाखालील संघाची फलंदाजी आणि रणनीती महत्त्वाची ठरणार आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा (मर्यादित षटके)
रोहित शर्मा – 1150 धावा (30 डाव)
साैरव गांगुली – 1046 धावा (20 डाव)
एमएस धोनी – 1037 धावा (46 डाव)
विराट कोहली – 769 धावा (17 डाव)
मोहम्मद अझरुद्दीन – 637 धावा (22 डाव)