आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतसा स्पर्धेचा रोमांच वाढत आहे. एकापेक्षा एक खेळाडू स्पर्धेतून पुढे येत आहेत. तसेच, अनोखे विक्रम रचत आहेत. अशातच स्पर्धेचा 40वा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात दोन षटकार लागताच विश्वचषक 2023मध्ये इतिहास घडला.
झाले असे की, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या डावातील 17व्या षटकाच्या पहिल्या आणि 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेविड मलान या स्टार फलंदाजाने खणखणीत दोन षटकार मारले. त्याने षटकार मारताच विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील एकूण षटकारांची संख्या 500 झाली. अशाप्रकारे वनडे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा पराक्रम घडला.
विश्वचषक 2023मध्ये 500 षटकार
खरं तर, विश्वचषकाच्या एका हंगामात सामन्यांनुसार सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम विश्वचषक 2023मध्ये घडला. कारण, 48 वर्षांच्या वनडे विश्वचषक इतिहासात कोणत्याच हंगामात 500 षटकार मारण्याचा विक्रम घडला नव्हता. विशेष म्हणजे, विश्वचषक 2023 स्पर्धेत 500 षटकार हे अवघ्या 40 सामन्यात पार पडले. तसे पाहिले, तर स्पर्धेतील अजून 8 सामने बाकी आहेत. त्यापूर्वीच ही कामगिरी फत्ते झाली.
यापूर्वी विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार 2015मध्ये मारले गेले होते. त्या हंगामात 49 सामन्यांमध्ये 463 षटकारांची बरसात झाली होती. त्यापूर्वी 2007मध्ये 51 सामन्यात 373 षटकार मारले गेले होते. तसेच, यादीत चौथ्या स्थानी 2019चा हंगाम असून या हंगामातील 48 सामन्यात 357 षटकारांचा पाऊस पडला होता.
Most sixes in a World Cup edition (matches):
2023 -500 (40)*.
2015 – 463 (49).
2007 – 373 (51).
2019 – 357 (48). pic.twitter.com/FVZHxE1yaB— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 8, 2023
विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार (सामन्यांनुसार)
2023 -500 षटकार (40)*
2015 – 463 षटकार (49)
2007 – 373 षटकार (51)
2019 – 357 षटकार (48)
स्पर्धेत सर्वाधिक षटकार कुणाच्या नावे?
विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंचा विचार केला, तर यादीत अव्वल स्थानी रोहित शर्मा (8 सामने) आणि दुसऱ्या स्थानी ग्लेन मॅक्सवेल (7 सामने) आहेत. त्यांच्या नावावर 22 षटकार आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी डेविड वॉर्नर (8 सामने) आहे. त्याने 20 षटकार मारले आहेत. याव्यतिरिक्त 18 षटकारांसह क्विंटन डी कॉक (8 सामने) चौथ्या, तर फखर जमान (3 सामने) पाचव्या स्थानी आहेत. (Most sixes in a World Cup edition by matches see list)
हेही वाचा-
‘मी त्याला शुभेच्छा देणार नाही…’, वर्ल्डकपमधील शमीच्या धमाकेदार प्रदर्शनाबद्दल पत्नीचे धक्कादायक विधान
लय भारी! मॅक्सवेलची विस्फोटक खेळी पाहून अभिनेता रितेश देशमुखही बनला फॅन, म्हणाला, ‘हारलेली लढाई…’