राजकोट। गुरुवारी(7 नोव्हेंबर) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश संघात(India vs Bangladesh) दुसरा टी20 सामना(2nd T20I) पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात प्रभारी कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.
याबरोबरच रोहितने एक खास विक्रम केला आहे. रोहितने या सामन्यात 43 चेंडूत 85 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. त्याचे आता 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 66 षटकार झाले आहेत.
त्यामुळे रोहित 2019 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार(Most Sixes in International Cricket) मारणारा खेळाडू ठरला आहे.
विशेष म्हणजे 2017 आणि 2018 मध्येही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितनेच सर्वाधिक षटकार मारले होते. त्याने 2017 मध्ये 65 षटकार तर 2018 मध्ये 74 षटकार मारले होते.
त्यामुळे एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत रोहितने 2017 मध्ये केलेल्या त्याच्याच कामगिरीला मागे टाकले आहे.
आणखी एक खास गोष्ट म्हणजे रोहितने जानेवारी 2016 पासून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 251 षटकार मारले आहेत. या कालावधीत अन्य कोणत्याही फलंदाजाला 150पेक्षा अधिक षटकार मारता आलेले नाहीत.
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
74 षटकार – रोहित शर्मा – 2018
66 षटकार – रोहित शर्मा – 2019*
65 षटकार – रोहित शर्मा – 2017
63 षटकार – एबी डिविलियर्स – 2015
59 षटकार – ख्रिस गेल – 2012
#2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
66 षटकार – रोहित शर्मा
58 षटकार – ख्रिस गेल
51 षटकार – ओएन मॉर्गन
रोहितचा १००वा टी२० सामना टीम इंडियासाठीही ठरलाय खास, जाणून घ्या कारण
वाचा👉 https://t.co/TB2EqUUGWe#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019
व्हिडिओ: १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणाऱ्या रोहित शर्माने दिली 'ही' प्रतिक्रिया
वाचा👉 https://t.co/9pWY5BcmLH #म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket #IndvsBan #RohitSharma— Maha Sports (@Maha_Sports) November 7, 2019
रोहितआधी १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूचे नाव मात्र लोकांना माहित नाही
वाचा-👉https://t.co/68sW2pAxdd#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN— Maha Sports (@Maha_Sports) November 7, 2019