भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा याने पॉवरप्लेमध्येच 2 षटकार ठोकले आणि खास विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, त्याने हा विक्रम करताच भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचा विक्रमही मोडीत काढला.
रोहित शर्माचा विक्रम
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत उतरताच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. रोहितने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेन्री शिप्ले याला जोरदार षटकार मारला. त्यानंतर त्याने पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शिप्ले याच गोलंदाजाला दुसरा षटकार ठोकला. हा षटकार ठोकताच रोहितच्या नावावर जबरदस्त विक्रम नोंदवला गेला.
भारतामध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा अव्वलस्थानी पोहोचला आहे. त्याने एमएस धोनी (MS Dhoni) याचा विक्रम मोडीत काढत हे स्थान पटकावले. रोहितने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक 125 षटकार मारले आहेत, तर धोनीच्या नावावर वनडेत भारतात 123 षटकारांची नोंद आहे. तसेच, तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) असून त्याने वनडे क्रिकेटमध्ये भारतात 71 षटकार मारले आहेत. तसेच, चौथ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) असून त्याने 66 षटकार मारले आहेत, तर पाचव्या स्थानी असलेल्या युवराज सिंग (Yuvraj Singh) याने वनडेत भारतात 63 षटकार मारले आहेत.
भारतात वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
125 षटकार- रोहित शर्मा*
123 षटकार- एमएस धोनी
71 षटकार- सचिन तेंडुलकर
66 षटकार- विराट कोहली
63 षटकार- युवराज सिंग
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर रोहित शर्मा त्याची फटकेबाजी उशिरापर्यंत सुरू ठेवू शकला नाही. रोहितला या सामन्यात 38 चेंडूत 36 धावाच करता आल्या. यामध्ये 4 चौकारांचाही समावेश होता. (Most sixes in ODI in India Rohit Sharma Is top in the list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉसचा निकाल भारताच्या पारड्यात! दोन धुरंधरांचे पुनरागमन, तर ईशानचाही ताफ्यात समावेश
सरफराजने शतक ठोकल्यानंतर ‘सिद्धू मूसेवाला’च्या अंदाजात केले सेलिब्रेशन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध