टी२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा झेल सोडल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली याच्यावर भरपूर टीका झाली होती. अगदी पाकिस्तानी चाहत्यांनी त्याच्या कुटुंबियांवरही निशाणा साधला होता. परंतु आता याच हसन अलीने क्रिकेटच्या मैदानावर दमदार पुनरागमन केले आहे. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात त्याने ५ विकेट्स हॉल (एका डावात ५ विकेट्स) घेण्याची किमया केली आहे.
प्रथम फलंदाजी करताना यजमान संघ ३३० धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशला या धावसंख्येवर रोखण्यात पाकिस्तानचा पाकिस्तानचा २७ वर्षीय वेगवान गोलंदाज हसन अली याचा मोठा वाटा राहिला. त्याने बांगलादेशच्या डावादरम्यान २०.४ षटके गोलंदाजी करताना ५१ धावांवर ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या ५ विकेट्समध्ये बांगलादेशचा शतकवीर लिटन दास याच्याही विकेटचा समावेश आहे. तसेच यादरम्यान त्याने ५ षटके निर्धाव टाकली होती.
विशेष म्हणजे, हसन अलीने यंदाच्या वर्षात एका कसोटी डावात ५ विकेट्स घेण्याची ही पाचवी वेळ आहे. यासह हसन अली हा एका कँलेडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५ विकेट्स हॉल घेणारा दुसरा पाकिस्तानी गोलंदाज बनला आहे. या विक्रमात त्याच्यासोबत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इमरान खान, वकार युनिस, सकलेन मुश्ताक आणि यासिर शहा हे संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत.
तर वकार युनिस सर्वाधिक ६ वेळा ही कामगिरी करत अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी १९९३ मध्ये ६ वेळा एका कसोटी डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
Overs: 2⃣0️⃣.4⃣
Runs: 5️⃣1️⃣
Wickets: 5️⃣
Econ: 2️⃣.4⃣6️⃣Well bowled @RealHa55an 👏👏
Scorecard: https://t.co/y98nWOUpXk#BANvPAK | #HarHaalMainCricket pic.twitter.com/XJYrELwFx6
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 27, 2021
एका कॅलेंडर वर्षात पाकिस्तानसाठी कसोटीत सर्वाधिकवेळा पाच विकेट्स हॉल:
६ – वकार युनिस (१९९३)
५* – हसन अली (२०२१)
५ – इम्रान खान (१९८२)
५ – वकार युनूस (१९९०)
५ – सकलेन मुश्ताक (१९९९)
५ – यासिर शाह (२०१७)
हसन अलीव्यतिरिक्त शाहिन शाह आफ्रिदी आणि फहीम अश्रीफ यांनीही पाकिस्तानकडून प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच साजिद खान यानेही एका विकेटचे योगदान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“झहीरला पाहून कर्णधार होण्याची प्रेरणा मिळाली”; कमिन्सने केला खुलासा
ऍशेससाठी बेन स्टोक्स सज्ज, गॅबा स्टेडियमवर केली गोलंदाजांची धुलाई, पाहा व्हिडिओ
‘मी आता सांगू शकतो का?’, रिटेंशनविषयी सीएसकेने विचारलेल्या प्रश्नावर जडेजाची मजेशीर प्रतिक्रिया