पुणे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील (IPL 2022) ३९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. मंगळवारी झालेला हा सामना राजस्थान रॉयल्सने २९ धावांनी जिंकला. या सामन्यात १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ ११५ धावांवरच सर्वबाद झाला. यामुळे बेंगलोरच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.
सर्वाधिकवेळा सर्वबाद होणारे संघ
बेंगलोरची (Royal Challengers Bangalore) आयपीएलमध्ये सर्वबाद होण्याची ही २२ वी वेळ होती. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वबाद होणाऱ्या संघांमध्ये बेंगलोर संघ दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, त्यांनी राजस्थानला मागे टाकले आहे. राजस्थान (Rajasthan Royals) संघ २१ वेळा आयपीएलमध्ये सर्वबाद झाला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ २३ वेळा आयपीएलमध्ये सर्वबाद झाला आहे. तसेच पंजाब किंग्स या यादीत चौथ्या क्रमांकावर असून ते २० वेळा आयपीएलमध्ये सर्वबाद झाले आहेत (Most times getting all out in IPL).
बेंगलोरने जिंकला सामना
मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्राथमिकत: बेंगलोरच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला होता. त्यांनी राजस्थानच्या १५ व्या षटकापर्यंत १०० धावांच्या आत ५ विकेट्स घेतल्या होत्या. पण नंतर रियान परागने याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला २० षटकांत ८ बाद १४४ धावा करण्यात यश मिळाले. बेंगलोरकडून मोहम्मद सिराज, जोश हेजलवूड आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच हर्षल पटेलने १ विकेट घेतली.
त्यानंतर १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस व्यतिरिक्त कोणालाच २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. डू प्लेसिसने बेंगलोरकडून सर्वाधिक २३ धावा केल्या. त्यामुळे बेंगलोरचा डाव १९.३ षटकांत ११५ धावांवरच संपुष्टात आला. राजस्थान रॉयल्सकडून कुलदीप सेनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने ३ आणि प्रसिद्ध कृष्णाने २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
Video: आधी भांडण, मग हँडशेकसाठी नकार; रियान पराग-हर्षल पटेल यांच्यात भर मैदानात राडा
अरर! ‘गोल्डन डक’वर बाद होताच मॅक्सवेलचा नकोसा विक्रम, तब्बल ‘इतक्यांदा’ शून्यावर आऊट
‘…तेव्हा आम्हाला रोखणे कठीण होईल’, कोलकाताच्या कर्णधाराचे मोठे वक्तव्य