मुंबई । युएईमध्ये होणार्या आयपीएल 2020 च्या तयारीला सर्व संघानी सुरूवात केली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यंदा चौथे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सीएसकेला करायच्या आहेत. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, सीएसकेचा संघ सर्वात आधी यूएईमध्ये दाखल होईल. जेणेकरून ते तेथील वातावरणासाठी स्वत: ला तयार करु शकतील.
गल्फ न्यूजच्या माहितीनुसार, एमएस धोनी आणि त्याचा संपूर्ण संघ ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात युएईला पोहोचेल. त्याचबरोबर अन्य सात संघ ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यात युएईला रवाना होतील. सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाच्या मते, कोरोना साथीच्या आजारामुळे त्यांचे खेळाडू बर्याच दिवसांपासून घरी आहेत. बर्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर क्रिकेटबरोबर ताळमेळ बसविण्यासाठी त्यांना थोडा वेळ हवा आहे.
या आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा एमएस धोनीवर लागून राहिल्या आहेत. धोनी जवळजवळ एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. वर्ल्ड कप 2019 पासून धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल स्पर्धेसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत, पण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्याची ही दुसरी वेळ आहे. 2014 च्या सुरुवातीच्या काळात येथे आयपीएलच्या सातव्या सत्रातील निम्मे सामने खेळले गेले होते. हा निर्णय भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे बीसीसीआयने घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–असा ऑलराऊंडर होणे नाही, माजी क्रिकेटर गौतम गंभीरचा या खेळाडूवर कौतूकाचा वर्षाव
–देशासाठी इतके वर्ष क्रिकेट खेळूनही माजी कर्णधार आज नोकरीच्या शोधात, घर चालवायलाही नाहीत पैसे
आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघालाच यूएईत जिंकता आला नाही एकही सामना; पहा कोणी किती सामने जिंकलेत
येत्या काळात क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळू शकतात या ४ मोठ्या क्रिकेट मालिका
ट्रेंडिंग लेख-
यूएईमध्ये आयपीएल सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज; एका भारतीयाचा समावेश
२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी
काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा