आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीसाठी हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे, पण आयपीएलमध्ये तो अजूनही खेळत आहे. चाहत्यांमध्ये धोनीची लोकप्रीयता थोडीही कमी होताना दिसत नाही. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. असे असले तरी, अशी एक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते.
‘या’ कारणास्तव एमएस धोनी घेऊ शकतो स्पर्धेतून माघार
माध्यमांमध्ये सध्या अशी माहिती प्रसारित होत आहे की, एमएस धोनी (MS Dhoni) कंबरेच्या दुखण्याने त्रस्त आहे. याच कारणास्त धोनीला डॉक्टरांकडून ४ ते ५ आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला गेला आहे. अशात धोनी आयपीएलच्या आगामी हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांतून बाहेर होऊ शकतो. तसेच, धोनीच्या अनुपस्थितीत अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सीएसकेचे कर्णधारपद सांभाळेल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
दरम्यान, कंबरदुखीमुळे धोनीला जरी ४ किंवा ५ आठवडे विश्रांतीवर राहण्याची इच्छा नसली, तरीही त्याला किमान २ आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. अशात रवींद्र जडेजाला सीएसकेचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, अशी पूर्ण शक्यता आहे. धोनीसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो, त्यानंतर तो आपीएलमधून निवृत्ती घेईल, अशी शक्यता आहे. अशात सीएसकेला एका चांगल्या नेतृत्वाची गरज नक्कीच आहे.
यापूर्वीही धोनीली अनेकदा कंबरदुखीलमुळे विश्रांती घ्यावी लागली आहे, परंतु त्यावेळी अनुभवी सुरेश रैनावर सीएसकेच्या नेतृत्वाची जबाबदारी येऊन पडायची. आगामी हंगामात मात्र रैनाच्या अनुपस्थितीत जडेजा सीएसकेचे नेतृत्व करताना दिसू शकतो. रवींद्र जडेजाच्या रूपात सीएसकेकडे नियमित कर्णधारपदाचाही एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. धोनीला जरी पहिल्या काही सामन्यांमध्ये विश्रांती घ्यावी लागली, तर चाहत्यांची इच्छा असेल की, तो लवकरात लवकर फिट व्हावा आणि त्यानेPhoto Courtesy: Twitter/IPL संघात पुनरागमन करावे.
महत्वाच्या बातम्या –
आधी संघाला बनवलं विश्वविजेता अन् आता रणजीमध्ये धूलने केला कहर कारनामा; अवघ्या ३ सामन्यात ठोकलं शतक
पहिली कसोटी: भारताने श्रीलंकेचा उडवला धुव्वा, फक्त ३ दिवसातच १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला सामना
ब्रेकिंग! आयपीएल २०२२चे वेळापत्रक जाहीर; चेन्नई सुपर किंग्स अन् ‘या’ संघात होणार पहिला सामना