Loading...

३ महिने क्रिकेटपासून दूर असलेला धोनी खेळतोय हा खेळ

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील 3 महिने क्रिकेटपासून दूर आहे. तो भारताकडून शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला आहे. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे.

Loading...

पण या विश्रांतीदरम्यान धोनी बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूरसोबत नुकताच मुंबईमध्ये फुटबॉल खेळताना दिसून आला आहे. त्याचा अर्जून कपूरबरोबर फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

धोनी हा फुटबॉलचा मोठा चाहता असून तो लहानपणी त्याच्या शाळेत फुटबॉल खेळायचा. तसेच तो इंडियन सुपर लीगमधील (आयसीएल) चेन्नईइन एफसीचा सहमालकही आहे.

तसेच धोनीने याआधी मागीलवर्षी एका चॅरिटी फुटबॉल सामन्यातही सहभाग घेतला होता.

धोनीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नोव्हेंबरपर्यंत विश्रांती घेतली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तो आता थेट डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.

Loading...
You might also like