भारतीय क्रिकेटमध्ये आजकाल अनेक युवा खेळाडू संधी मिळण्यासाठी झगडत आहेत. यांपैकी अनेकजण सधअया खएळत असलेल्या खेळाडूंकडून शिकत असतात. मात्र, सर्वात अधिक प्रमाण पाहिले तर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीकडून प्रेरणा घेऊन आणि आदर्श घेऊन खेळण्यासाठी धडपडणारे खेळाडू अनेक आहेत. अशातील एक म्हणजे युवा अष्टपैलू शिवम दुबे. शिवमने अशाच धोनीबाबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.
“एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणे हा एक अद्भुत शिकण्याचा अनुभव होता. तो संपूर्ण संघाचा आदर्श आणि मार्गदर्शक आहे. त्याच्यासोबत खेळल्याने मला खूप फायदा झाला, ज्यामुळे माझी कामगिरी चांगली राहिली.” असं म्हणत शिवम दुबेने धोनीचे आभार मानले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताचा स्टार ऑलराऊंडर पंड्याला दुखापत! तब्बल ३ आठवडे राहणार क्रिकेटपासून दूर
एशिया कप २०२२मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवायला तयार आहे केएल राहुल