इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामाची सुरुवात होण्यासाठी काही तास शिल्लक आहे. यावेळी कोव्हिड-19 या साथीच्या रोगामुळे आयपीएलचे आयोजन युएईमध्ये होणार आहे. पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गतवर्षीचा उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात अबूधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांचे चाहते आणि क्रिकेटपटू या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सुमारे सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर क्रिकेटपटू मैदानावर येणार आहेत, तर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर मैदानात उतरेल. या विशेष सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सीएसकेला इशारा दिला आहे.
रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मुंबई इंडियन्सबरोबरील सरावाची काही छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले की, “तयारी पूर्ण झाली आहे, आता योजना अंमलात आणण्याची वेळ आली आहे.”
https://www.instagram.com/p/CFRqtbDBpty/
मुंबई इंडियन्स संघ सीएसके विरुद्ध नेहमीच चांगला खेळतो. इतकेच नव्हे तर, सीएसकेला मागील वर्षी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर एका धावाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. धोनी आणि त्याचा संघ हा पराभव विसरणार नाही. एकेवेळी असे वाटत होते की सीएसके सलग दुसर्या वर्षी हे विजेतेपद सहज जिंकेल, परंतु मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी विशेषत: लसिथ मलिंगाने हा सामना मुंबईच्या दिशेने फिरवला. सीएसकेने 2018 मध्ये विजेतेपद जिंकले आणि त्यानंतर 2019 मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
चेन्नई सुपर किंग्जचा संभाव्य ११ जणांचा संघ :
शेन वॉटसन, मुरली विजय, फाफ डु प्लेसीस, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार), केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, इम्रान ताहिर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर.
मुंबई इंडियन्स संभाव्य ११ जणांचा संघ :
क्विंटन डि कॉक, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरान पोलार्ड, राहुल चहर, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
महत्त्वाच्या बातम्या –
दीपक चाहराने १५ वर्षांचा जुना फोटो केला शेअर; शेन वॉट्सनसाठी दिला ‘हा’ खास संदेश
आयपीएलचा पहिला सामना कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर
‘हा’ गोलंदाज मलिंगाची कमतरता पूर्ण करेल;ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने सांगितले नाव
ट्रेंडिंग लेख –
“नवा बोथम” म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफ विषयी १० रंजक गोष्टी
‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार
हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन