आयपीएल २०२० च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील पाचवा सामना मंगळवारी (२३ सप्टेंबर) रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईने ४९ धावांनी विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने ५ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या. मुंबईने दिलेल्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघ ९ विकेट्स गमावत १४६ धावाच करु शकला.
कोलकाता संघाकडून फलंदाजी करताना पॅट कमिन्सने १२ चेंडूत सर्वाधिक ३३ धावा केल्या. यामध्ये १ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. सोबतच कर्णधार दिनेश कार्तिकनेही चांगली फलंदाजी करत ३० धावा केल्या. पुढे नितीश राणाव्यतिरिक्त (२४ धावा) इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही.
मुंबईकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहर या गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सोबतच कायरन पोलार्डनेही १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीस आलेल्या मुंबई संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५४ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकार मारत सर्वाधिक ८० धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत ४७ धावा आणि सौरभ तिवारीने १३ चेंडूत २१ धावा केल्या. तसेच पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (१८ धावा) हिट विकेट होत पव्हेलियनला परतला.
कोलकाता संघाकडून गोलंदाजी करताना शिवम मावीने सर्वाधिक २ विकेट्स चटकावल्या. त्याचबरोबर सुनिल नरेन आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी १ विकेट चटकावली. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोलंदाजाला एकही विकेट घेता आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-१५ कोटींना खरेदी केलेल्या खेळाडूने पहिल्याच षटकात दिल्या १५ धावा
-वेळ लागला! परंतू धोनीच्या विक्रमाची कार्तिकने केली बरोबरी
-मुंबईच्या ‘या’ अवलियाचे नाव ऐकले की कोलकाताचे गोलंदाज म्हणतात, नको रे बाबा!
ट्रेंडिंग लेख-
-हॉटस्पॉट आणि स्निकोमीटर; नक्की भानगड आहे तरी काय भाऊ?
-आयर्लंड-इंग्लंड-आयर्लंड असा प्रवास करणारा एड जॉयस
-आणि शाहरुखने पुन्हा वानखेडेवर नाही ठेवले पाऊल