कोणताही क्रिकेटपटू त्याच्या यशाचे श्रेय, त्याच्या मेहनतीला देत असतो. तर काही क्रिकेटपटू त्यांना घडवणाऱ्या प्रशिक्षकाला आपल्या यशाचे श्रेय देत असतात. परंतु पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने आपल्या खेळातील उत्तम कामगिरीचे श्रेय चक्क धर्मांतराला दिले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार धर्मांतर केल्यामुळे त्याच्या फलंदाजीमध्ये सुधारणा झाली आहे.
पाकिस्तान संघासाठी २८७ वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसुफ याने, धर्मांतर केल्यामुळे आपल्या फलंदाजीमध्ये सुधारणा झाल्याचे वक्तव्य केले आहे. या फलंदाजाने २००५ मध्ये ख्रिस्ती धर्म सोडून इस्लाम धर्म स्विकारला होता. त्यांनतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती.
भारतीय संघाविरुद्ध २००६ मध्ये झालेल्या मालिकेत त्याने १९९ चेंडूवर १७३ धावांची ताबडतोड खेळी केली होती. याच वर्षी त्याने इंग्लंड दौऱ्यावर देखील आक्रमक फलंदाजी केली होती.२००६ मध्ये त्याने ९९.३३ च्या सरासरीने तब्बल १७७८ धावा केल्या होत्या. त्याने ९ शतक झळकावत विवियन रिचर्ड्सचा विक्रम मोडून काढला होता. यासोबतच त्याने एकापाठोपाठ एक ६ शतक झळकावत डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
धर्मांतराबाबत मोहम्मद युसुफचे विधान
त्याने दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “कोणीही माझ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली नाही. खरं तर मी सईद अनवरचा खूप जवळचा होतो. मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. मी जेव्हा त्याच्या घरी असायचो तेव्हा मी पहिलं होत की त्याचे कुटुंब खूप अनुशासीत होते आणि त्यांचे आयुष्य मला खूप शांत वाटत होते. तसेच सईद अनवरच्या मुलीच्या मृत्यूनंतर तो अजूनच धार्मिक झाला होता. त्यांना पाहून मलादेखील इस्लाम धर्म स्विकारण्याची प्रेरणा मिळाली.”
महत्वाच्या बातम्या:
पृथ्वी शॉचा झंझावात सुरूच! उपांत्य सामन्यातही तुफानी शतक ठोकत घातली या विक्रमांना गवसणी
भारतीय क्रिकेटची पहिली रनमशीन : विजय हजारे