भारताचा ऑलिम्पिक सूवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने जसप्रीत बुमराह याला आपला आवडता वेगवान गोलंदाज म्हटले. त्याला बुमराहची ऍक्शन खासकरून आवडते. पण भालाफेकपटूकडून भारतीय गोलंदाजाला एक खास सल्ला देखील मिळाला आहे. या सल्ल्यामुळे बुमराहच्या चेंडूची गती आधीपेक्षा वाढेल, असे नीरज चोप्राला वाटते.
नीरज चोप्रा () भारतासाठी भालाफेक स्पर्धेत ऑलिम्पिक जिंकणारा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा खेळाडू आहे. मागच्या काही वर्षात त्याने भालाफेक स्पर्धेत एकहाती सत्ता केली आहे. तसेच स्वतःच्या फिटनेसला देखील चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवले आहे. दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या काही वर्षात अनेकदा दुखापतग्रस्त झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत बुमराह संघासाठी महत्वाचा गोलंदाज ठरला. त्याने या स्पर्धेत एकूण 20 विकेट्स घेतल्या होत्या.
बुमराहची गोलंदाजी भारताला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाची ठरली. पण नीरज चोप्राच्या मते बुमराह आपल्या गोलंदाजी सुधारणा करू शकतो. यासाठी त्याला आपल्या रन-अपमध्ये बदल करावा लागेल. नीरज चोप्रा म्हणाला, “मला जसप्रीत बुमराह आणि त्याची शैली आवडते. मला त्याची ऍक्शन अनोखी वाटते. पण चेंडूचा वेग वाढवण्यासाठी तो रन-अप वाढवू शकतो, असे मला वाटते.”
दरम्यान, बुमराह मागच्या काही वर्षात दुखापतींनी ग्रासला असला, तरी त्याची गणना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. आपल्या अनोख्या ऍक्शनमुळे फलंदाजांना त्याचा चेंडू लवकर समजत नाही. पण हीच ऍक्शन बुरमहाच्या दुखापतीचे कारण याआधी ठरली आहे. कंबरेच्या दुखापतीमुळे बुमराह जवळपास एक वर्ष भारतीय संघातून बाहेर राहिला आहे. पण विश्वचषकाआधी त्याने सुदैवाने पुनरागमन केले आणि संघासाठी योगदान देऊ शकला. भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला. (Neeraj Chopra advises Jasprit Bumrah to increase the speed of the ball)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान गोलंदाजाने सांगितला 11 वर्ष जुना किस्सा; म्हणाला, ‘मी विराटला म्हणलं आज तुझी काही…’
सचिनने ‘Sam बहादुर’ सिनेमा पाहताच विकी कौशलची भावूक पोस्ट; म्हणाला, ‘माझ्या बालपणीच्या हिरोने आज माझा…’