भारतीय संघाने नागपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. सामना संपल्यानंतर भारतीय संघाला आनंदित करणारी एक बातमी समोर येतेय. सलग दुसऱ्यांदा आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत मजल मारण्यापासून भारतीय संघ केवळ दोन पावले दूर आहे.
नागपूर येथे झालेला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने एकतर्फी आपल्या नावे केला. केवळ तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित करत भारताने ही कसोटी आपल्या नावे केली. यासह भारताने मालिकेत आघाडी घेतली. तसेच, जागतिक कसोटी क्रमवारीच्या गुणतालिकेत दुसरे स्थान देखील भक्कम केले.
Two teams are now out of contention for the #WTC23 Final after India's thumping innings win against Australia 👀
More 👇https://t.co/22RpYMOpUQ
— ICC (@ICC) February 11, 2023
या सामन्यानंतर जागतिक कसोटी क्रमवारीच्या गुणतालिकेत फारसा बदल झाला नाही. मात्र, या अंतिम फेरीसाठी आवश्यक असलेली गुणांची टक्केवारी मात्र ऑस्ट्रेलियाची घसरली आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 140 गुण व 75.56 अशी टक्केवारी होती. मात्र, या पराभवानंतर चार गुणांचे नुकसान त्यांना झाले. तसेच, टक्केवारी देखील 70.83 इतकी कमी झाली. असे असले तरी ते अद्याप गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.
दुसरीकडे भारतीय संघाला या विजयाचा मोठा फायदा झाला. या विजयानंतर भारताच्या खात्यात 12 गुणांची भर पडून ही संख्या 111 अशी पोहोचली. तर, गुणांच्या टक्केवारीतही मोठी वाढ होऊन ही टक्केवारी आता 58.93 वरून 61.67 अशी वाढलेली आहे. भारतीय संघाने या मालिकेत आणखी दोन विजय मिळवल्यास संघ थेट जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल.
भारत व ऑस्ट्रेलिया यांना या अंतिम फेरीसाठी केवळ श्रीलंका संघ लढत देताना दिसतोय. त्यांनी न्यूझीलंड विरुद्ध मार्च महिन्यात होणारे दोन्ही सामने जिंकल्यास ते अंतिम फेरीत खेळताना दिसू शकतात. स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून रोजी ओव्हल येथे खेळला जाईल.
(New World Test Championship Points Table India Strong There Second Spot)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी धोक्याची घंटा! ऑस्ट्रेलियाने मायदेशाहून बोलावला हुकमी एक्का, कोण आहे तो?
भारताच्या विजयांमध्ये सर्वात मोठे योगदान अश्विनचेच, भज्जी अन् झहीर खान तर लईच लांब