न्यूझीलंड क्रिकेट संघाचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार जॉन रीड यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. न्यूझीलंड क्रिकेटचे बुधवारी (१४ ऑक्टोबर) त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. पण त्यांच्या मृत्यूमागील कारण अद्याप त्यांनी स्पष्ट झाले नाही.
रीड यांच्याविषयी बोलताना न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेविड व्हाईट यांनी म्हटले की, “न्यूझीलंडच्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखात त्यांचे नाव होते आणि पुढेही राहिल. त्यांना ज्या-ज्या गोष्टीची मदत मागण्यात येत असायची, ते त्या प्रत्येक गोष्टीसाठी होईल तशी मदत करायचे.”
३ जून १९२८ला ऑकलँडमध्ये त्यांचा जन्म झाला होता. पण त्यांचे शिक्षण मात्र वेलिंग्टनमध्ये झाले. वयाच्या केवळ १७व्या वर्षी त्यांना देशांतर्गत प्रथम श्रेणी संघात स्थान मिळाले होते. १९४७ ते १९६५ या काळात त्यांनी २४६ प्रथम श्रेणी सामने खेळत तब्बल १६१२८ धावा केल्या होत्या. तर गोलंदाजी त्यांनी ४६६ विकेट्सची कामगिरी केली होती.
प्रथम श्रेणी पदार्पणाच्या २ वर्षांच्या आतच म्हणजे १९४९ साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांची न्यूझीलंड कसोटी संघात निवड झाली होती. पुढे १९६५ पर्यंत त्यांनी ५८ कसोटी सामने खेळले. त्यात ६ शतके आणि २२ अर्धशतकांच्या मदतीने त्यांनी ३४२८ धावांची खात्यात नोंद केली. तर ८५ फलंदाजांना त्यांना बाद केले होते.
५०-६०च्या दशकात जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांना गणले जात होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंड संघाने पहिला कसोटी सामना जिंकला होता. त्यांनी तब्बल ३४ कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाच्या नेतृत्त्वाची कमान सांभाळली होती. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रीड हे न्यूझीलंड क्रिकेट संघाचे निवडकर्ता, संघ व्यवस्थापक आणि आयसीसीचे मॅच रेफरीदेखील बनले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
“सुनिल नरेन नसल्यामुळे केकेआरचं काही अडत नाही,” माजी दिग्गजाचं रोखठोक मत
अररर! एकाच चेंडूवर झाला ‘दोन वेळा बाद’, पाहा कशी झाली फजिती
ट्वेंटी ट्वेंटीमध्ये ‘जाळ आणि धूर संगटच’ करणारा खेळाडू घेणार पंतची जागा?
ट्रेंडिंग लेख-
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार
प्रतिभेला संधी हीच तर आयपीएलची खासियत.! एकेकाळचा बॉल बॉय आज बनलाय संघाचा आधार
गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…