---Advertisement---

IPL 2024 Auction: चेन्नईने दाखवला न्यूझीलंडच्या फलंदाजावर विश्वास, एकट्यावर केले तब्बल ‘एवढे’ कोटी खर्च

On: मंगळवार, डिसेंबर 19, 2023 3:00 PM
Daryl-Mitchell
---Advertisement---

IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीग 2024 लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला जात आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंना 10 कोटींपेक्षा जास्तीची बोली लावत फ्रँचायझींनी आपल्या ताफ्यात घेतले आहे. यामध्ये न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज डॅरिल मिचेल याच्या नावाचाही समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने या लिलावात रचिन रवींद्र याच्यानंतर मिचेल या न्यूझीलंडच्या आणखी एका स्टार खेळाडूवर विश्वास दाखवत त्याला आपल्या ताफ्यात घेतले. विशेष म्हणजे, मागील हंगामात तो अनसोल्ड राहिला होता.

डॅरिल मिचेल मालामाल
डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावात 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईजसह उतरला होता. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चढाओढ सुरू होती. मात्र, शेवटी 5 वेळचा आयपीएल चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने या धुरंधराला तब्बल 14 कोटी (Daryl Mitchell 14 Crore IPL 2024 Auction) रुपयात आपल्या ताफ्याचा भाग बनवले.

विश्वचषकात घातला धुमाकूळ
डॅरिल मिचेल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने अलीकडेच पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत वादळी फलंदाजी केली होती. त्याने 10 सामन्यात फलंदाजी करताना 69च्या सरासरीने 552 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 2 शतकेही निघाली होती.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1737037804415393925

आयपीएलचा कमी अनुभव
डॅरिल मिचेल याला आयपीएल 2022 हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने 75 लाखांच्या बेस प्राईजमध्ये ताफ्यात घेतले होते. त्याला आयपीएल स्पर्धेचा खूपच कमी अनुभव आहे. त्याने या हंगामात फक्त 2 सामने खेळताना 33 धावा केल्या होत्या. (New Zealand star Daryl Mitchell sold to Chennai Super Kings for INR 14 Crore in ipl 2024)

हेही वाचा-
हर्षल पटेलचं नशीब फळफळलं! 2 Crore बेस प्राईजचे झाले तब्बल ‘एवढे’ कोटी, पंजाबने दाखवला विश्वास
IPL 2024: हॅरी ब्रूकवर दिल्लीने पाडला पैशांचा पाऊस, तब्बल ‘एवढे’ कोटी देऊन घेतले संघात

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---