सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्याठिकाणी न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभवाच्या छायेत आहे. कारण पाकिस्तान संघाने 373 धावांचा पाठलाग करताना आपले तीन फलंदाज गमावले आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तान संघाने 3 गडी गमावून 71 धावा केल्या होत्या.
तत्पूर्वी न्यूझीलंड संघाने आपला दुसरा डाव 5 गडी गमावून 180 धावसंख्येवर घोषित केला. न्यूझीलंड संघाच्या वतीने टॉम ब्लंडेलने 64 आणि टॉम लॅथमने 53 धावांची खेळी केली. त्याचबरोबर पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली. परंतु केन विलियम्सन दुसर्या डावात 21 धावा करू शकला. त्यानंतर हेन्री निकोल्सने 11 आणि राॅस टेलरने 12* धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाने पहिल्या डावातील धावांच्या जोरावर पाकिस्तान संघापुढे 373 धावांचे आव्हान ठेवले होते.
दुसर्या डावात फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. संघाचे सलामी फलंदाज शान मसूद आणि आबिद अली खातेही न उघडता बाद झाले. त्यामुळे पाकिस्तान संघाने एकही धाव न करता दोन विकेट्स गमावल्या. त्यांनंतर हॅरिस सोहेल आणि अजहर अली यांनी 37 धावांची भागीदारी केली. परंतु याच धावसंख्येवर हॅरिस सोहेल 9 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे पाकिस्तान संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 3 विकेट्स गमावून 71 धावा केल्या आहे.
त्यामुळे पाकिस्तान संघाला पाचव्या दिवशी विजयासाठी 302 धावांची गरज आहे. त्याचबरोबर फवाद आलम आणि अजहर अली यांनी संघाला सावरताना चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 34 धावांची भागीदारी केली आहे. फवाद आलम आणि अजहर अली हे अनुक्रमे 21 आणि 34 धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंड संघाकडून टीम साउदीने 15 धावा देताना दोन गडी बाद केले. त्याचबरोबर ट्रेंट बोल्टने 24 धावा देताना 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी न्यूझीलंड संघाने आपल्या पहिल्या डावात 155 षटकात सर्वबाद 431 धावा केल्या होत्या. त्यांनंतर पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 102 षटकांत सर्वबाद 239 धावा केल्या होत्या. त्यांनतर आता न्यूझीलंड संघाने 5 गडी गमावून 180 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला आहे. पाकिस्तान संघाने दुसर्या डावात चौथा दिवस अखेर 3 गडी गमावून 38 षटकांत 71 धावा केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान संघाला पाचव्या दिवशी विजयासाठी 302 धावांची गरज आहे. तसेच त्यांच्या हातात अजून 7 विकेट्स आहेत.
महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग! सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– बीसीसीआयमुळे भंगल युवराजचं पुन्हा क्रिकेट खेळण्याचं स्वप्न, या टूर्नामेंटद्वारे करणार होता पुनरागमन