वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून (११ डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. वेलिंग्टन येथे चालू असलेल्या या सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाने धडाकेबाज प्रदर्शन करत ४६० धावा केल्या. मात्र न्यूझीलंडच्या या भलामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजची धावसंख्या ८ बाद १२४ धावा इतकी आहे. तर जोशुआ डी सिल्वा आणि केमर होल्डर संघाचा डाव पुढे नेत आहेत.
न्यूझीलंडचा पहिला डाव
या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्यण घेतला आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. या ५ दिवसीय कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंडचा डाव ६ बाद २९४ धावांवर संपला. यात हेन्री निकोल्सच्या दीडशतकी खेळीचा समावेश होता. निकोल्सने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २१ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक १७४ धावा केल्या.
तसेच नील वेगरनरच्या नाबाद ६६ धावांच्या तूफानी खेळीमुळे न्यूझीलंड संघ पहिल्या डावात ४६० धावा करु शकला. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना शॅनन गॅब्रीयल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर केमर होल्डर आणि रोस्टन चेज यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूत धाडले.
वेस्ट इंडिजचा पहिला डाव
परंतु, न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज क्रेग ब्रेथवेट खाते न उघडताच बाद झाला. तर डॅरेन ब्रावो केवळ ७ धावांवर पव्हेलियनला परतला. एवढेच नव्हे तर, वेस्ट इंडिजच्या ५ फलंदाजांना २० धावांचा आकडा गाठण्यातही यश आले नाही.
केवळ जरमेन ब्लॅकवुड ५० पेक्षा जास्त धावा करु शकला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ब्लॅकवुडने ११ चौकार लगावत ६९ धावा केल्या. पण शेवटी न्यूझीलंडचे खेळाडू टीम साउथी आणि टॉम लॅथमने मिळून त्याला झेलबाद केले. अशाप्रकारे दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस ८ बाद १२४ धावांवर संपला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ न्यूझीलंड संघापेक्षा ३३६ धावांनी पिछाडीवर आहे.
अशात न्यूझीलंड संघ कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजला सर्वबाद करत फॉलोऑनसाठी बोलवण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषक जिंकून देण्यात युवराजची भूमिका सर्वात महत्त्वाची; पाहा आकडे काय सांगतात?
जरा इकडे पाहा! वाढदिवशीच युवराजने मागितली माफी, नाही करणार आनंद साजरा
बादशाहच्या गाण्यावर थिरकली चहलची होणारी पत्नी, Video होतोय तुफान व्हायरल