भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. टी20 फाॅरमॅटच्या क्रिकेटमध्ये तो बादशहा आहे यात काही शंका नाही. पण एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो धावा काढण्यासाठी संघर्ष करताना आपण पहिले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा फाॅर्म खूपच खराब आहे. याशिवाय कसोटी क्रिकेटमधील पहिले काही सामने त्याच्यासाठी चांगले नव्हते. परंतु, आता सूर्यकुमार यादव देशासाठी तिन्ही फॉरमॅट खेळण्यास उत्सुक आहे. म्हणूनच तो टीम इंडियामध्ये पुनरागमनाचा मार्ग उघडणारी कोणतीही देशांतर्गत संधी गमावू इच्छित नाही.
सोमवारी (26 ऑगस्ट) सराव सत्रादरम्यान इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मलाही कसोटी संघात स्थान मिळवायचे आहे. भारताकडून पदार्पण केल्यानंतर मला दुखापत झाली. त्यानंतर संघात अनेक खेळाडूंना संधी मिळाली. त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. ते असे खेळाडू आहेत ज्यांना यावेळी संधी देण्यास पात्र आहेत. त्यामुळे मी संघात खेळेन का नाही ते माझ्या हातात नियंत्रणात नाही, सध्या मझ्या नियत्रंणात स्पर्धा खेळणे आणि चांगली कामगिरी करत राहणे, एवढेच आहे. पुढे बघुयात काय होते ते पाहू.”
सूर्यकुमार यादवची बुची बाबू स्पर्धेसाठी संघात निवड झाली आहे. सर्फराज अहमद त्याच्या संघाचा कर्णधार असेल. आधी त्याचे नाव या संघात नव्हते, पण नंतर सूर्यानेच ही स्पर्धा खेळण्याची इच्छा व्यक्त केली. दुलीप ट्रॉफी सुद्धा 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, परंतु आज (27 ऑगस्ट) तो तामिळनाडू विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बुची बाबू स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. सूर्यकुमार यादवने श्रीलंका दौऱ्यावर टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना पहायला मिळाला होता. आणि त्याने मालिकाही जिंकली.
हेही वाचा-
महिला टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर…! ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान
कोहलीच्या भविष्यावर माजी दिग्गजानं केलं खळबळजनक वक्तव्य!
लखनऊ सुपर जायंट्स राहुलला कायम ठेवणार? आयपीएल 2025 लिलावापूर्वी संजीव गोयंकांची घेतली भेट