---Advertisement---

SA vs NZ: रचिन रवींद्रने चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली, विक्रमी खेळीने इतिहास रचला

On: बुधवार, मार्च 5, 2025 6:31 PM
---Advertisement---

(Champions Trophy SA vs NZ) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय आतापर्यंत योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. या सामन्यात न्यूझीलंडची सलामीवीर रचिन रवींद्रने शानदार फलंदाजी केली. ज्यात त्याने शतक झळकावले. या शतकी खेळीसोबतच त्याने काही विक्रमही आपल्या नावावर केले. रचिनच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. त्याने त्याचे सर्व एकदिवसीय शतके फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच झळकावली आहेत. (Rachin Ravindra century)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील रचिन रवींद्रचे हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात एकाच हंगामात दोन शतके करणारा तो पहिला किवी फलंदाज आहे. रचिन रवींद्रने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत 5 शतके झळकावली आहेत. याआधी त्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात तीन शतके झळकावली होती. (Rachin Ravindra century Records In ODI)

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक  शतके

3 – ख्रिस गेल, 2006
2 – सौरव गांगुली, 2000
2 – सईद अन्वर, 2000
2 – हर्शेल गिब्स, 2002
2 – उपुल थरंगा, 2006
2 – शेन वॉटसन, 2009
2- शिखर धवन, 2013
2 – रचिन रवींद्र, 2025

दरम्यान, न्यूझीलंडसाठी सर्वात कमी डावांमध्ये 5 शतके ठोकण्याच्या बाबतीत रचिन रवींद्र दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 28 डावांमध्ये पाचवे एकदिवसीय शतक झळकावले. या यादीत डेव्हॉन कॉनवेचे नाव सर्वात वर आहे. कॉनवेने 22 डावांमध्ये 5 एकदिवसीय शतके केली होती. यादीत तिसऱ्या क्रमांकावर डॅरिल मिशेल (30 डाव), केन विल्यमसन (56 डाव) आहेत.

न्यूझीलंडसाठी सर्वात कमी डावांमध्ये 5 एकदिवसीय शतके

22 – डेव्हॉन कॉनवे
28 – रचिन रवींद्र
30 – डॅरिल मिशेल
56 – केन विल्यमसन

हेही वाचा-

NZ vs SA: सेमीफायनलमध्ये केन विल्यमसनचा जलवा! झळकावले शानदार शतक
दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड सामन्यात पावसाने हजेरी लावल्यास, रिझर्व्ह डे असणार का नाही?
सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, पाकिस्तानला मोठा फटका बसण्याची शक्यता!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---